Kokam Sharbat (Photo Credits-Facebook)

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. तर उन्हाळ्यात वारंवार तहान लागते. त्यामुळे काही जण ताहान भागवण्यसाठी पाणी किंवा थंड पेये पिताना दिसून येतात. मात्र अतिप्रमाणात थंड पेये पिणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते. म्हणून थंड पेयांसाठी पर्याय म्हणून लिंबाचे सरबत किंवा कोकम सरबत उन्हाळ्यात प्यायल्याने आरोग्यासाठी उत्तम असते.

कोकमच्या फळापासून आपल्याला थंडावा मिळतो. तसेच काही जण हे फळ सुकवून त्यांचे कोकम तयार करतात. तर जाणून घेऊया कोकम सरबत उन्हाळ्यात प्यायल्याने काय फायदे होतात.(Summer Tips: उन्हाळ्यात उसाचा रस पिण्याचे 10 गुणकारी फायदे)

->कोकम सरबत प्यायल्याने पचनाची क्रिया सुरळीत राहते. तसेच वजन कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते.

->कोकममध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि मँगनीज हे भरपूर प्रमाणात आढळून येत असल्यान हृदयाचे कार्य उत्तमरित्या सुरु राहण्यासाठी मदत होते.

->व्हिटामिन सी, सायट्रिक अॅसिडसह अनेक पोषक तत्वे कोकममध्ये असल्याने रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत होते.

->फायबर मोठ्या प्रमाणात असते तर कॅलरीजचे प्रमाण कोकममध्ये कमी असते.

त्यामुळे कोकम सरबत पिण्याचे आरोग्याला भरपूर फायदे होतात. त्याचसोबत आरोग्य तंदुरुस्त राहण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळ्यात थंड पेये पिण्यापेक्षा कोकम सरबत प्यायल्याने तहान भागवण्यास मदत होईल.