Snake Venom: सर्पदंशामधून विषाने नशा केली जाऊ शकते का? जाणून घ्या या Drug Addiction ची लक्षणं, साईड इफेक्ट्स
Snakes | Image Used for representational purpose only । (Photo Credits: Pixabay)

अनेकजण दु:खाचा किंवा यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना वास्तवाचा विसर पडावा म्हणून Nicotine, Cannabis, आणि Opium सारख्या पदार्थांची मदत घेतात. जगभरात त्याकडे recreational drugs म्हणून पाहिलं जातं.  पण काहींचा कल हा स्मोकिंग, इंजेक्टिंग आणि सापाचं विष पिऊन नशा करण्याकडेही असतो. साप, विंचू अशांपासून विष मिळवून नशा केली जाते. पण अशा प्रकारचे विष हे खरंच तुम्हांला नशेखोर करू शकतं का? जाणून घ्या त्यामागील काही खास गोष्टी!

सापाच्या विषाचं ड्र्ग्स आणि लक्ष्णं

सापाच्या विषाच्या मदतीने नशा केली जाऊ शकते. सर्पदंशामध्ये साप चावल्यानंतर यामुळेच वेदना देखील जाणवत नाहीत. ते वेदनाशमक असतं. opioids आणि अन्य अंमली पदार्थाच्या सेवना मध्ये त्यांच्या दुष्परिणामांमध्ये हे वेदनाशमन असणं टाळण्यासाठी औषधं दिली जातात. Nicotinic acetylcholine receptors जे neurotransmitter acetylcholine वर परिणाम करत असतात ते कोब्रा विषामध्ये असलेल्या न्यूरोटॉक्सिनच्या प्रकारांमुळे प्रभावित होतात.

सापाचं विष घेण्याचे दुष्परिणाम कोणते?

नशेसाठी सापाचं विष घेणं हे धोकादायक आहे. शेवटी ते एका प्रकारचं विषचं आहे. त्यामधून कोणतीच मज्जा घेतली जाऊ शकत नाही ( मज्जा कोणत्याच अंमली पदार्थात नसते). साप या विषाचा वापर हल्ला केलेल्याला ठार करण्यासाठी करतो. सापाचं विषाचा ओव्हरडोस किंवा मृत्यू टाळण्याचा कोणताही पर्याय नाही. एका दंशामध्ये किती विष जाईल याचा अंदाज नसतो. तसेच सापाच्या विषामधील neurotoxicity हे euphoric response देणारं असल्याने त्यामुळे मृत्यू देखील ओढावू शकतो. नक्की वाचा:  Elvish Yadav विरूद्ध गुन्हा दाखल; रेव्ह पार्टीच्या आयोजनासोबत विषारी सापांच्या तस्करींचे आरोप .

सापाच्या विषाच्या  ओव्हर डोसाची ट्रीटमेंट काय असते?

गंभीर सापाच्या विषावर antivenom चा उपचार केला जातो. जितक्या लवकर antivenom दिल्र जाईल, तितक्या लवकर कायमस्वरूपी विषारी नुकसान टाळले जाईल. सापाच्या विषाचा ओव्हरडोज झालेल्या व्यक्तीला जरा वेळही एकटे सोडणे योग्य नाही. त्यांना बेशुद्ध होण्याचा किंवा चक्कर येण्याचा त्रास होत असेल तर त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेले पाहिजे.