![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2018/09/contact-lense-784x441-380x214.png)
आजकालच्या जीवनशैलीचा, कामाच्या स्वरुपाचा परिणाम आपल्या डोळ्यांवरही दिसू लागला आहे. त्यामुळे अनेकांना चश्मा असतो. पण अनेकदा लोक चश्माऐवजी कॉन्टॅट लेन्सचा पर्याय निवडतात. यामुळे चश्म्याचा त्रास टाळता येत असला तरी इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.
तुम्हाला कॉन्टॅट लेन्समुळे डोळे लाल होणे, खाज येणे, जळजळ होणे, अशा समस्या उद्भवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. कॉन्टॅट लेन्समुळे उद्भवणाऱ्या 5 समस्या....
डोळे लाल होणे
कॉन्टॅट लेन्सच्या नियमित वापराने डोळे लाल होतात. ही सामान्य समस्या आहे असे समजून लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पण तुमची ही बेपर्वाई डोळ्यांसाठी घातक ठरते. त्यामुळे कॉन्टॅट लेन्सच्या वापराने डोळे लाल होत असल्यास तज्ञांच्या सल्ला घ्या.
डोळे सुजणे
कॉन्टॅट लेन्सच्या वापराने डोळे कोरडे होतात. खरंतर सॉफ्ट व हार्ड कॉन्टॅट लेन्स घातल्याने डोळ्यात अश्रूंची कमतरता निर्माण होते आणि डोळे कोरडे होऊ लागतात. त्यामुळे कॉन्टॅट लेन्सचा वापर शक्यतो टाळलेलाच बरा.
डोळ्यांचे इन्फेक्शन
कॉन्टॅट लेन्स वापरताना डोळ्यांची योग्य ती स्वच्छता न राखल्यास डोळ्यांत इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. इन्फेक्शनपासून सुरक्षित राहण्यासाठी लेन्स लावण्यापूर्वी किंवा काढण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्या. लेन्स सोल्यूशनने लेन्स स्वच्छ करा आणि मगच लावा. काढल्यानंतरही लेन्स स्वच्छ करूनच लेन्स केसमध्ये ठेवा.
पापण्या सुजणे
डोळ्यांना लेन्स लावताना योग्य ती काळजी न घेतल्यास डोळ्यांच्या पापण्यांना सूज येऊ शकते. पापण्यांना सूज येत असल्यास लेन्स लावणे टाळा. अन्यथा पापण्यांची सूज अधिक वाढू शकेल.
कॉर्नियासंबंधित समस्या
त्याचबरोबर कॉर्नियासंबंधित समस्याही उद्भवू शकतात. खरंतर लेन्सच्या समस्येमुळे कॉर्नियापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला न घेतल्यास कॉर्नियाचा आकार बदलू शकतो.
टिप : कॉन्टॅट लेन्सच्या वापराने डोळ्यांसंबंधित कोणतीही समस्या येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. कॉन्टॅट लेन्स डोळ्यात असताना काही त्रास झाल्यास डोळे चोळू नका. तर कॉन्टॅट लेन्स काढून डोळ्यांवर थंड पाण्याचे हबके मारा.