Ramadan 2021: रमजानमध्ये रोजा ठेवणारी व्यक्ती Coronavirus Vaccine घेऊ शकते? Plasma दान करू शकते? जाणून घ्या अशा काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे
Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

रमजानचा (Ramadan 2021) पवित्र महिना सुरू झाला आहे. या काळात मुस्लीम बांधव रोजा (Roja) म्हणजेच उपवास ठेवतात. सध्या कोरोना विषाणू (Coronavirus) काळात देशात लसीकरण मोहीम सुरु आहे, त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी लस घेणेही महत्वाचे आहे. मात्र उपवास असताना आपण लस घेऊ शकता? उपवास चालू असताना एखादी व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकते? असे अनेक प्रश्न लोक विचारत आहेत. कदाचित तुमच्याही मनात असे काही प्रश्न असतील. प्रख्यात इस्लामिक विद्वान आणि फतेहपुरी मशिदीचे शाही इमाम डॉ. मुफ्ती मुकर्रम अहमद यांनी या प्रश्नांची उत्तरे दिली आहे. नवभारत टाईम्सने याबाबत माहिती दिली आहे.

रोजा असलेली व्यक्ती लस घेऊ शकते?

याचे सरळ सोपे उत्तर ‘नाही’ असेच आहे. मात्र एक प्रश्न उपस्थित होतो की रोजा ठेऊनच का लस घ्यायची? शरीयतमध्ये, आरोग्याशी संबंधित गरजा भागविण्यासाठी रोजा सोडण्यापासून सूट देण्यात आली आहे. ही लस काही सामान्य इंजेक्शन नाही. ही लस घेतल्यानंतर लोकांना निरिक्षणाखाली राहावे लागते आणि काही समस्या उद्भवल्यास उपचार देखील केले जातात. अशा परिस्थितीत, ज्या दिवशी लस घ्यायची असेल त्या दिवशी आपण उपास न केल्यास चांगले. या व्यतिरिक्त बर्‍याच ठिकाणी रात्रीच्या वेळी लसीकरण मोहीम राबवली जात आहे, अशा ठिकाणी तुम्ही लस घेऊ शकता.

जर एखाद्या व्यक्तीने रोजा ठेवला असेल आणि तिला प्लाझ्मा दान करायचा असेल, तर ते करू शकतात?

हो, नक्कीच अशी व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकते. इस्लाममध्ये एखाद्याचा जीव वाचविणे हे एक अत्यंत महत्त्वाचे कार्य म्हणून सांगितले गेले आहे. त्यामुळे प्लाझ्मा देण्यास काहीच हरकत नाही. रोजा ठेवणारी व्यक्ती रक्तही दान करू शकते. मात्र प्लाझ्मा किंवा रक्त रोजा असणाऱ्या व्यक्तीला दिले जाऊ शकत नाही. या गोष्टी दान करतानाही काळजी घ्यावी की उपवास सुटणार नाही. गरज पडल्यास रोजा तोडणे गुन्हा नाही. मात्र कारण नसताना उपवास तोडणे हा एक मोठा गुन्हा आहे, तो टाळला पाहिजे. (हेही वाचा: Sehri, Iftar 2021 Timings In Maharashtra: मुंबई, जळगाव, मालेगाव, अहमदनगर येथील यंदाच्या सेहरी, इफ्तार चं महिन्याभराचं वेळापत्रक इथे पहा)

तारावीह सध्या घरी पठण करावी का मशीदमध्ये?

सध्याची परिस्थिती लक्षात घेता लोकांना सतत आवाहन केले जात आहे की, तारवीह फक्त घरातच वाचले पाहिजे. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 5 वेळा प्रार्थना करण्याची सवय लावणे. तारावीह घरी एकट्यानेही पठन केले जाऊ शकते. यासाठी दोन-चार जणांनी घरी एकत्र जमात बनवली तर चांगली गोष्ट आहे. मशिदीत तारावीह पठन करण्याबाबत, सरकारच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे. याशिवाय तारवीहची प्रार्थना दीड ते दीड तास चालत असल्याने, इतका वेळ मशिदीत जास्त लोक असतील तर संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. तारावीह घरीच पठन करावी.

जर काही कारणास्तव तुम्हाला रोजा सोडावा लागला, तर अशावेळी काय करावे?

इस्लाममध्ये, गरज पडल्यास आणि आजारपणात लोक उपवास सोडू शकतात असे सांगितले आहे. त्याऐवजी वर्षाच्या कोणत्याही दिवशी उपवास केला जाऊ शकतो. याशिवाय ज्या दिवशी तुमचा उपवास सुटला असेल त्या दिवशी एखाद्या गरजूला 2 किलो 45 ग्रॅम गहू किंवा त्याच्या बरोबरीची रक्कम द्या.