Sehri, Iftar 2021 Timings In Maharashtra: मुंबई, जळगाव, मालेगाव, अहमदनगर येथील यंदाच्या सेहरी, इफ्तार चं महिन्याभराचं वेळापत्रक इथे पहा
Photo Credit : Pixabay

Ramzan 2021 Sehri, Iftar Timings: मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र असलेल्या रमजान (Ramzan) महिन्याची सुरूवात यंदा भारतात 14 एप्रिल पासून होणार आहे. या महिन्यात रोजा च्या स्वरूपात उपवास ठेवले जातात. त्यामुळे मुस्लिम बांधवांना सकाळी सेहरी (Sehari) आणि संध्याकाळी इफ्तारची (Iftar)  वेळ ही खास महत्त्वाची असते. पहाटे सेहरी पूर्वी अन्न खाण्यास मुभा असते. त्यानंतर दिवसभर उपवास ठेवला जातो. तर संध्याकाळी इफ्तार नंतर पुन्हा अन्न ग्रहण करण्यास परवानगी असते. त्यामुळे तुम्ही देखील यंदा रमझानच्या या पवित्र महिन्यात रोझा ठेवणार असाल तर पहा महाराष्ट्रात जळगाव(Jalgaon), मालेगाव (Malegaon), अहमदनगर (Ahmednagar), मुंबई (Mumbai) शहरातील यंदाच्या सकाळी सेहरी आणि संध्याकाळी इफ्तारच्या नेमक्या वेळा काय आहेत? Ramzan Mubarak 2021 HD Images: रमजान ईदच्या पाक महिन्यात WhatsApp Stickers, Photo Messages, Wallpapers, GIFs च्या माध्यमातून द्या सर्वांना शुभेच्छा.

 

मुंबई मधील इफ्तार, सेहरी वेळापत्रक

Mumbai Iftar Sehri Timings

जळगावमधील इफ्तार सेहरी वेळापत्रक

Jalgaon Sehri Iftar Timings 2021

मालेगाव मधील इफ्तार सेहरी वेळापत्रक

Malegaon Iftar Sehri Timings

अहमदनगर मधील इफ्तार सेहरी वेळापत्रक

Ahmednagar Iftar Sehri Timings

पुणे शहरातील इफ्तार सेहरी वेळापत्रक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

रमजानच्या महिन्यात मशिदींमध्ये एक खास नमाज, तरावीह पठण केले जाते. मात्र यंदा राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मशिदींमध्ये एकत्र नमाजचे पठण करण्यावर बंदी घातली आहे. अशावेळी लोकांनी घरातच सेहरी आणि इफ्तारवेळेसह इतरही नमाज पठण घरातच करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इस्लाम धर्माची मान्यता आहे की, रमजानच्या महिन्यात स्वर्गाचे दरवाजे उघडले जातात आणि नरकाचे दरवाजे बंद होतात. या महिन्यात अल्लाह, प्रार्थना करणाऱ्या आणि उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीला आशीर्वाद देतो. रमझान संपल्यावर येणाऱ्या बीजेच्या दिवशी ईद-उल-फ़ित्र ऊर्फ रमझान ईद साजरी होते.