Ramzan Mubarak 2021 HD Images: रमजान ईदच्या पाक महिन्यात WhatsApp Stickers, Photo Messages, Wallpapers, GIFs च्या माध्यमातून द्या सर्वांना शुभेच्छा
Ramzan Mubarak (Photo Credit: File Photo)

Ramzan Mubarak 2021 HD Images:  मुस्लीम समुदायातील लोकांसाठी रमझान हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात जगभरातील मुस्लीम समुदाय अल्लाहकडे प्राथना करतात. यावर्षी रमजानचा पाक महिना येत्या बुधवारपासून (14 एप्रिल) सुरु होण्याची शक्यता आहे. परंतु, ही तारीख चंद्रावर अवलंबून असते. रमजानच्या सुरुवातीपासून ईदपर्यंत मुस्लिम समाजात प्रचंड उत्साह पाहायला मिळतो. रमजानच्या महिन्यात मुस्लीम समुदाय मोठ्या प्रमाणात 30 दिवसांचा उपवास करतात. तसेच त्यांच्या देवाकडे प्रार्थना करतात. त्यानंतर शेवटच्या दिवशी चंद्राचे दर्शन झाल्यानंतर  उपवास सोडतात आणि मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करतात.

ईदचा सण रमजान महिन्याच्या शेवटी साजरा केला जातो, परंतु रमजान महिन्याच्या सुरूवातीस 'रमजान मुबारक' म्हणण्याची प्रक्रिया सुरू होते. या महिन्यात आपल्या नातेवाईक, मित्र आणि जवळच्या लोकांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी खालील मॅसेज फायदेशीर ठरणार आहेत. व्हॉट्सअॅप स्टीकर्स, एचडी इमेज, फोटो, वॉलपेपर आणि जीईएफच्या माध्यमातून अनेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करू शकतात. हे देखील वाचा- Ramzan 2021 Moon Sighting in India, Pakistan, Bangladesh, UK and Other Countries Live News Updates: मुस्लीम धर्मियांचा पवित्र महिना, 'रमजान' कधीपासून सुरू होईल?

फोटो-

फोटो-

फोटो-

फोटो-

भारतासह संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट वावरत आहे. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सण लॉकडाऊनच्या निर्बंधांखाली साजरे केले गेले आहेत. यंदाची रमजान ईदही अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करावी लागणार आहे. तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारच्या नियमावलीचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.