पाकिस्तान आणि बांगलादेशातमध्येही चंद्रदर्शन झाल्याचे वृत्त नाही. त्यामुळे या देशांत 14 एप्रिलपासून रमजानचा पवित्र महिना सुरू होण्याची शक्यता आहे.

आज भारतात चंद्र न दिसल्याने रमजानचा पवित्र महिना 14 एप्रिलपासून सुरू होणार आहे. भारताच्या कुठल्याही भागात चंद्र दिसल्याची कोणतीही नोंद झाली नाही त्यामुळे भारतातील विविध हिलाल समित्यांनी जाहीर केले आहे की, भारतातील पवित्र रमजान महिना 14 एप्रिलपासून सुरू होईल.

सौदी अरेबियामध्ये चंद्राचे दर्शन झाल्याचे स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले आहे, त्यामुळे सौदीमध्ये उद्यापासून रमजानच्या पवित्र महिन्याला सुरुवात होत आहे. अजूनतरी याबाबत अधिकृतरीत्या घोषणा झाली नाही.

Sri Lanka येथे आज चंद्र दिसला नाही, त्यामुळे देशात रमजानची सुरुवात 14 एप्रिलपासून होईल. 

लखनौच्या Markazi Chand Committee ने सांगितले की, आतापर्यंत जगातील कोणत्याही देशात चंद्र दिसला नाही, त्यामुळे रमजानचा पहिला रोजा 14 एप्रिल रोजी असेल. मात्र जर का आज चंद्र दिसला तर, रात्री उशिरा याबाबत माहिती देण्यात येईल.

सौदी अरेबियाच्या Moon Sighting Committee ने सांगितले की, सोमवार, 12 एप्रिल हा शाबान हिजरी कॅलेंडरचा शेवटचा आणि 30 वा दिवस असेल. म्हणजेच उद्यापासून रमजान सुरु होईल. 

मुस्लीम धर्मियांचा पवित्र महिना रमजान होऊ घातला आहे. काल चंद दिसला नाही, त्यामुळे आज चंद्र दिसून उद्यापासून रोजा सुरु होण्याची आशा आहे.  

इस्लामिक कॅलेंडरनुसार (Ramadan) नववा महिना रमजान आहे. रमजान महिना मुस्लिम बांधवांसाठी खूप महत्वाचा आहे. हा बरकत, रहमतचा महिना मानला जातो. जगभरातील इस्लामवर विश्वास ठेवणारे लोक रमजानच्या संपूर्ण महिन्यात अल्लाची प्रार्थना करतात, कुराण पढतात, नमाज अदा करतात. लोक रमजानच्या चंद्राची डोळे लावून वाट पाहत असतात. चंद्र दिसल्यानंतरच पवित्र महिन्याला आणि रोजाला सुरुवात होते. दरम्यान, गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार रविवारी, 11 एप्रिलला सौदी अरेबियामध्ये चंद्र दिसला नाही, अशा परिस्थितीत 13 एप्रिलला पहिला रोजा असेल.

उर्दू जिओ टीव्हीच्या वृत्तानुसार, सौदी अरेबियातील चंद्र पाहणा-या समितीने सांगितले होते की रविवारी देशात कुठेही चंद्र दिसला नाही, त्यामुळे सोमवारी रात्री चंद्र दिसून पहिला रोजा 13 एप्रिल रोजी मंगळवारी असेल. तज्ज्ञांच्या मते 13 एप्रिल रोजीच जगातील इतर देशांमध्ये रमजानच्या महिन्याला सुरुवात होईल. पाहूया भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ब्रिटन आणि इतर देशांमध्ये रमझान 2021 मून साइटिंग नक्की कधी होईल.

दरम्यान, पहिला रोझा 14 तास 8 मिनिटांचा असण्याची शक्यता आहे. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव कडक उपवास ठेवतात. सूर्यास्तापासून सूर्यास्तापर्यंत हा उपवास चालतो, याकाळात अल्लाहची प्रार्थना केली जाते.