Pfizer (Photo Credits: IANS)

कोविड-19 (Covid-19) चा संसर्ग होऊन गेलेल्यांना फायझर/बायोएनटेक (Pfizer/BioNTech) लसीचा एक डोस पुरेसा असण्याची शक्यता अभ्यासातून व्यक्त होत आहे. यामुळे अजून लाखो लसी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. अभ्यासात BNT162b2 (Pfizer/BiNTech) लसीच्या पहिल्या डोस नंतर आधी संक्रमित व्यक्तींमध्ये कोविड-19 च्या अँन्टीबॉडीची पातळी जास्त दिसून आली, असे अमेरिकेच्या शिकागो मधील रॅश युनिर्व्हसिटीचे इंटरनल मेडिसनचे Ayesan Rewane यांनी दिली.

पूर्वी कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये IgG ची लेव्हल वाढून आल्याचे दिसून आले. पहिल्या डोसच्या तुलनेत दुसरा डोस दिल्यानंतर  IgG लेव्हलमध्ये अधिक वाढ दिसली नाही. त्यामुळे अशा रुग्णांसाठी केवळ एकच डोस पुरेसा होऊ शकतो. कोणताही संसर्ग नसणाऱ्या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये पहिला आणि दुसरा डोस दिल्यानंतर  IgG लेव्हलची चाचणी करण्यात आली.  त्यामुळे पूर्वी कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींना एकच डोस मिळावी याची शिफारस करण्यात येते, असे संशोधकांनी सांगितले आहे. या अभ्यासात सहभागी झालेले चारजण पीसीआर पॉझिटीव्ह आढळून आले पण त्यांच्यात S-protein अँटीबॉडीज नव्हते. (Pfizer आणि Moderna च्या कोविड-19 विरोधी लसीमुळे संसर्ग होण्याचा धोका 91 टक्क्यांपर्यंत कमी- Study)

जामा नेटवर्क ओपन मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात शिकागो मधील 29 कोरोनाबाधित रुग्ण आणि कोरोनाची लागण झालेल्या 30 रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. मात्र या अभ्यासात सहभागी झालेल्या व्यक्तींचा लिंग, वंश, राष्ट्रीयत्व आणि टी-सेल प्रतिसाद हे भिन्न असल्याने अभ्यासात काही मर्यादा आल्या आहेत. (UK कडून Pfizer/BioTech ची लस 12-15 वयोगटातील मुलांना देण्यास परवानगी)

दरम्यान, फायझर-बायोएनटेकची कोविड-19 लस 12-15 वयोगटातील मुलांवर ही लस वापरण्यात येणार असून ही लस कोविड-19 विरुद्ध अतिशय प्रभावशाली असल्याचे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.