Pfizer (Photo Credits: IANS)

ब्रिटेनच्या रेग्युलेटर कडून फायजर-बायोटेकची (Pfizer-BioTech) कोरोनावरील लस 12-15 वयोगटातील मुलांना देण्यास परवानगी दिली आहे. ब्रिटनेच्या औषध नियमाक यांनी शुक्रवारी असे म्हटले की, खोलवर याबद्दल समीक्षा केल्यानंतर असे समोर आले की फायजर-बायोटेकची लस ही अल्पवयीन मुलांसाठी सुरक्षित आहे. याच पद्धतीचे आकलन अमेरिका आणि युरोपातील युनियन कडून करण्यात आले होते. दरम्यान, युरोपियन मेडिसिन्स एजेंसी यांनी फायजर आणि बायोटेककडून विकसित करण्यात आलेल्या कोरोना विरोधातील लस 12-15 वयोगटातील मुलांना देण्यासाठी गेल्या महिन्यात सिफारीश केली होती. फायजर-बायोटेकच्या लसींना 27 देशातील युरोपल संघात सर्वात प्रथम मंजूरी दिली होती. डिसेंबर मध्ये 16 वय किंवा त्याहून अधिक वयातील लोकांना लस देण्यासाठी त्यांना परवाना दिला गेला होता.

लसींबद्दल समीक्षा करणाऱ्या EMA चे प्रमुख मार्को कावलेरी यांनी असे म्हटले की, एक सुरक्षित आणि प्रभावी लसीची सुरक्षा अल्पवयीन मुलांना देणे हे महासंकटाच्या विरोधातील एक महत्वपूर्ण पाऊल आहे. तसेच युरोपीय संघाच्या नियामक यांना अल्पवयीन मुलांना लसीच्या वापरासाठी परवानगी देण्यासाठी आवश्यक आकडेवारी मिळाली होती. त्यांनी ती कोविड19 च्या विरोधात अत्यंत प्रभावशाली असल्याचे म्हटले.(PakVac Corona Vaccine: बाजारात आली Pakistan ची Covid-19 लस; चीनच्या मदतीने केली तयार, मात्र प्रभावीपणाबाबत माहिती लपवली)

Tweet:

अमेरिकेतील 2 हजार अल्पवयीन मुलांवर अभ्यास करण्यास आले आणि त्याचे परिणाम समोर आले. त्यांनी असे म्हटले की, लस अत्यंत सुरक्षित असल्याचे दिसून आले. या वयोगटातील मुलांवरील परिणाम असे होते की, जसे कमी वयातील लोकांमध्ये पहायला मिळाले. तसेच कोणतीही चिंता करण्याची बाब सुद्धा समोर आली नाही. त्यांनी म्हटले की, या निर्णयावर युरोप आयोगाने परवानगी देणे गरजेचे आहे. विविध देशातील नियामकांना ठरवावे लागणार आहे की, 16 वर्षाहून कमी वय असलेल्यांना लस द्यावी की नाही.यापूर्वी कॅनडा आणि अमेरिकेतील नियामकांनी गेल्या एप्रिल मध्ये अशाच पद्धतीचा निर्णय घेतला होता. विकसित देश आपल्या अधिकाधिक लोकसंख्येला लस देण्याच्या दिशेने काम करत आहे.