Pfizer COVID-19 Vaccine ला भारतात आपात्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची कंपनीकडून मागणी
Pfizer (Photo Credits: IANS)

फायझर इंडिया (Pfizer India) ही Drugs Controller General of India कडे आपात्कालीन वापरासाठी परवानगी मागणारी पहिली कंपनी ठरली आहे. युके (UK) आणि बहिरन (Bahrain) या देशांमध्ये फायझरने बनवलेल्या लसीला आपात्कालीन वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर भारतामध्ये परवानगीसाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. फायझरने DCGI कडे मागणी करताना निवेदन पत्रामध्ये असे नमूद केले की, या लसीची भारतामध्ये आयात करुन त्याच्या विक्रीसाठी आणि स्वयंसेवकांवर या लसीचे क्लिनिकल ट्रायल्स करण्याची परवानगी द्यावी.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,फायझर इंडियाने DCGI कडे लसीच्या आपात्कालीन वापरासाठी 4 डिसेंबर रोजी अर्ज दाखल केला आहे. फायझरने Form CT-18 द्वारे भारतामध्ये लसीची आयात करण्यासाठी आणि त्याची विक्री करण्यासाठी EUA application सुद्धा दाखल केले आहे. (Covid-19 Vaccine Update: UK नंतर Bahrain मध्ये मिळाली Pfizer-BioNTech लसीला मंजूरी; लवकरच लसीकरणाला सुरुवात)

कोविड-19 विरुद्ध लढणाऱ्या फायझर बायोएनटेक लसीला परवानगी देणारा युके हा बुधवारी पहिला देश ठरला. युके च्या मेडिसिन अँड हेल्थ प्रॉडक्ट रेग्युलेटरी एजन्सीने या लसीच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. 95 टक्के परिणामकारक असलेल्या लसीला परवानगी देणे सुरक्षित आहे, असे  MHRA चे म्हणणे आहे.

शुक्रवारी, बहरीन या देशाने या लसीच्या EUA ला परवानगी देऊन आपात्कालीन वापरासाठी सुरुवात केली. या कंपनीने अमेरिकेकडे सुद्धा लसीच्या वापरासाठी EUA दाखल केला आहे. ही लस जतन करण्यासाठी -70 सेल्सियस इतके कमी तापमान लागते. ही लस भारतातील छोट्या छोट्या खेडे गावांमध्ये पोहचवणे आव्हानात्मक असणार आहे, अशी माहिती एका सरकारी अधिकाऱ्याकडून देण्यात आले आहे.

फायझरने याबद्दल बोलताना सांगितले की, भारत सरकारसोबत हातमिळवणी करुन लसीच्या वितरणासाठी वेगवेगळे मार्ग शोधून काढू. कोविड-19 संकटकाळात फक्त सरकारी माध्यमातूनच लसीचे वितरण केले जाईल. अशी माहिती ग्लोबल फार्माकडून देण्यात आली आहे.

भारतामध्ये एकूण पाच लसी या अंतिम टप्प्यात आहेत. त्यापैकी Oxford-Astrazeneca ची कोविड-19 लसीचा तिसरा टप्पा सीरम इंडिस्ट्यूटमध्ये सुरु आहे. Zydus Cadila या कोविड-19 विरुद्ध लसीला DCGI कडून फेज 3 ट्रायलसाठी परवानगी मिळाली आहे.