Covid-19 Vaccine Update: UK नंतर Bahrain मध्ये मिळाली Pfizer-BioNTech लसीला मंजूरी; लवकरच लसीकरणाला सुरुवात
Corona Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटाने गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जग त्रस्त आहे. त्यामुळे लसीचा विकास आणि उपलब्धता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या आठवड्यात ब्रिटेन ने कोरोना व्हायरस वरील फायझर-बायोएनटेक (Pfizer-BioNTech) लसीला आरोग्य विभागाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून ही लस संपूर्ण ब्रिटेन मध्ये उपलब्ध असेल. ब्रिटेननंतर आता बहरीन (Bahrain)ने देखील फायझर-बायोएनटेक निर्मित BNT162b2 या लसीला शुक्रवारी मंजूरी दिली आहे. ब्रिटेन नंतर कोविड-19 लसीला मंजूरी देणारा हा दुसरा देश ठरला आहे.

बहरीन चे राष्ट्रीय हेल्थ रेगुलेटरी अथॉरिटी (National Health Regulatory Authority)चे सीईओ डॉक्टर मरियम अल जलहमा (Dr Mariam Al Jalahma)यांनी देखील या लसीला मंजूरी दिल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. आरोग्य विभागाकडून मंजूरी मिळाल्यानंतर लवकरच ही लस आपात्कालीन वापरासाठी उपलब्ध होईल. (Pfizer-BioNTech COVID-19 Vaccine: जाणून घ्या जगातील सर्वप्रथम मान्यता मिळालेल्या लसीबद्दल खास गोष्टी!)

यापूर्वी ब्रिटेनच्या हेल्थ अँड सोशल केअर चे मीडिया प्रवक्ते यांनी फायझर-बायोएनटेक लसीबद्दल बोलताना सांगितले की, सरकारने स्वतंत्र औषध आणि हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी (एमएचआरए) च्या सूचनेनुसार सरकारने 2 डिसेंबर रोजी फायझर-बायोनोटेकच्या कोविड-19 लस वापरण्यास मान्यता दिली आहे. लसीच्या सुरक्षिततेच्या कठोर मानकांनुसार, गुणवत्ता आणि प्रभावीपणाचे आणि कित्येक महिन्यांच्या कठोर चाचण्यांनंतर डेटाचे सखोल विश्लेषण केल्यानंतर एमएचआरएच्या तज्ज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे.

बुधवारी फायझर-बायोएनटेक च्या कोविड-19 वरील लसीला परवानगी देऊन ब्रिटन जगातील पहिला देश ठरला. दरम्यान, आता भारतातही कोविड-19 लसीसाठी फार काळ वाट पाहावी लागणार नसून येत्या काही आठवड्यात लस देशात उपलब्ध होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.