तिळाचे लाडू (Photo Credits: Instagram, insta.shrads)

प्रत्येक सण एका विशिष्ट खाद्यपदार्थांशी जोडलेला आहे. त्या पदार्थाची आठवण काढली की त्याचाशी जोडलेला सण आपसूकच डोळ्यासमोर येऊन उभा राहतो. तीळ म्हंटल की मकर संक्रांती डोळ्यासमोर येते. 'तीळ गूळ घ्या गोड बोला' असं म्हणतं संक्रांतीच्या दिवशी तिळाच्या वड्या किंवा लाडू आपण वाटतो, पण तिळाचे फायदे तुम्हाला माहित आहे का? तीळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया तीळ खाण्याचे फायदे... (हेही वाचा, Bhogichi Bhaji Sankranti Special Recipe: भोगी निमित्त कशी कराल मिक्स भाजी आणि भाकरी; इथे पहा रेसिपी)

तीळ खाण्याचे फायदे-

1] तिळामध्ये तांबे ,मॅंगनीज ,कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी 1, बी 6 थायामिन फोलेट, नियासिन, मॉलिब्डेनम, सेलेनियम आणि झिंक या गोष्टी तिळामध्ये असतात.

२] तिळाच्या बियांमध्ये  सेसमिन आणि सेसमोलिन हे दोन घटक असतात.

३] तीळ खाल्ल्याने मधुमेहापासून तुमचा बचाव होईल.

४]  तिळामध्ये कॅल्शियम असल्यामुळे हाडे मजबूत होतात

५] तीळ खाल्ल्याने  कर्करोगाचा धोका देखील कमी होतो.

6] तीळ खाल्ल्याने पचन क्रिया सुधारते.

 7] कर्करोग केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी करताना अनेकांना रेडिएशनचा त्रास होते. या रेडिएशनमुळे शरीरावर होणाऱ्य हानीपासून देखील तीळ बचाव करते.
8] तुम्हाला जर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार असतील तर तुम्ही रोज तिळ खाल्ल्याने तुम्हाला फरक पडेल.
९] उच्च रक्तदाब कमी करण्याचे काम देखील तीळ करते.
१०] जुलाबाचा त्रास होत असेल तर एक चमचा भिजलेल्या तिळाची पूड, एक चमचा गायीचं तूप आणि सहा चमचे शेळीचं दूध एकत्र करून दिवसातून तीन वेळा घेतल्यास आराम पडेल.
११] पोट दुखत असेल किंला फुगलं असेल तर तिळाच्या तेलात हिंग घालून मालिश केल्याने आराम मिळतो.
12] मूळव्याधाचा त्रास असेल तर तीळ,हिंग वाटून लोण्यासोबत खाल्ल्याने आराम मिळतो