गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये उष्णतेचा तडाका वाढला आहे. राज्यात अनेक शहरांमधील तापमानात वाढ झाली आहे. के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये मागच्या काही दिवसांत दिवसात कमाल तापमान सरासरी पेक्षा 5,6 अंश जास्त राहीले. आता होसाळीकर यांनी अशा काही शहरे सांगितली आहे जिथे आह जास्तीत जास्त तापमान नोंदवले गेले. यामध्ये आज राज्यात सर्वात जास्त 41.2, तापमानाची नोंद चंद्रपूर येथे झाली आहे. त्यांनतर मुंबईमधील सांताक्रूझ 40.9, अकोला 40.4, जळगाव 40.4, सोलापूर 40.4 या ठिकाणी 40 अंशाच्या वर तापमान गेले आहे.
त्यांनंतर ब्रम्हपुरी 39.9, मालेगाव 39.8, परभणी 39.5, अमरावती व गडचिरोली 39, नाशिक 38.2, औरंगाबाद 38.2, सांगली 38.2, कोल्हापूर 38.2, पुणे 38.1, जालना, सातारा व कुलाबा येथे 38 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. मार्चमधील सर्वाधिक तापमान हे 28 मार्च 1956 रोजी नोंदवण्यात आले होते, ते 41.7 डिग्री सेल्सियस होते. सध्या उष्णता वाढत असल्याने लोकांना अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. मुख्यत्वे जे लोक बाहेर काम करत आहे, त्यांना उष्णतेचा प्रचंड त्रास होत आहे. त्यावर मात करण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने काही प्राथमिक उपचार सांगितले आहेत.
Some of the highest Tmax recorded today 27 Mar, in Maharashtra:
Santacruz 40.9 Colaba 38
Malegaon 39.8 Pune 38.1 Nasik 38.2 Parbhani 39.5 Jalna 38 A' bad 38.2
Klp 38.2 Sangli 38.2 Slp 40.4
Jalgaon 40.4 Satara 38 Akola 40.4 Chandrapur 41.2 Bramhapuri 39.9 Amravati & Gadchiroli 39 pic.twitter.com/KTRI9ursqb
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 27, 2021
या स्थितीमध्ये आपत्कालीन उपचार करावेत-
- मानसिक संतुलन बिघडले असल्यास
- गरम, लाल, रुक्ष त्वचा
- शरीराचे तापमान वाढल्यास
- मोठ्या प्रमाणावर डोकेदुखी
- चक्कर व उलटी येत असल्यास
- मांसपेशीमध्ये कमकुवतपणा जाणवत असल्यास
- डोके गरगरत असल्यास
- श्वास घेण्यास त्रास होत असल्यास
तीव्र उष्णतेमध्ये करावयाचे उपाय –
- ताबडतोब सावलीच्या ठिकाणी जावे आणि पाणी प्यावे
- जमिनीवर झोपून राहा, पाय वर करा, पाणी पीत रहा, डोक्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवा
अधिक माहिती आणि सूचनांसाठी 104 वर कॉल करा, तसेच गंभीर समस्या उद्भवल्यास ताबडतोब दवाखान्यात न्या किंवा 108 वर कॉल करा. (हेही वाचा: Mumbai Temperature: मुंबईमध्ये उष्णता वाढली; आज 40 अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद, उकाड्यामध्ये होणार अजून वाढ)
- जर कर्मचारी बेशुद्ध झाला, तर त्याला खाण्या पिण्यास काहीही देऊ नका.
- कर्मचाऱ्याला शुध्द आल्यास थोड्या वेळाने थंड पाणी द्या.
- हळुवारपणे कपडे सैल करा.
- सेफ्टी बेल्ट काढा.
- सजावटीची देखभाल करताना सैल कपडे.
- पाणी शिंपडा किंवा पाण्याची पट्टी ठेवा.
- पंख्याने वारे घाला
दरम्यान, होसाळीकर यांनी हे देखील सांगितले की, या तापमानामध्ये आणखीन वाढ होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणे गरजेचे आहे.