Diabetes: मधुमेहाच्या रुग्णांसाठी 'या' 4 डाळीचं सेवन करणं ठरेल फायदेशीर; ब्लड-शुगरची पातळी नियंत्रित राहण्यासही होईल मदत
Pulses (Photo Credit - pixabay)

Diabetes: आजकाल मधुमेह एक सामान्य समस्या बनली आहे. या आजारात रक्तातील साखरेची पातळी वाढते. तसेच हा आजार झाल्यानंतर रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण कमी होते. कार्बोहायड्रेट या अन्नघटकाच्या चयापचयात्मक विकृतीमुळे मूत्रातून बरेचसे ग्‍लुकोज उत्सर्जित होत असलेल्या रोगाला मधुमेह म्हणतात. मधुमेह शरीरातील अन्तःर्गतस्रावांच्या विस्कळितपणामुळे उद्भवणारा सामान्य आजार आहे. मधुमेह आजार हा कोणत्याही वयाच्या किंवा लिंगाच्या व्यक्तींना प्रभावित करतो. वैद्यकीय परिभाषेत मधुमेहाला डायबिटीस मेलिटस असे म्हणतात. रक्त प्रवाहातील अति रक्तग्लूकोझच्या पातळीवरून याचे निदान केले जाते. मधुमेहामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. यामुळे शरीराचे अनेक भाग आणि ऊतींना त्रास होतो. यासाठी मधुमेहाच्या रुग्णांची विशेष काळजी घेण गरजेचं असतं. भारतीय पाककृतीमध्ये डाळीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे सकाळच्या तसेच रात्रीच्या जेवणामध्ये दररोज डाळ वापरली जाते. आपण देखील मधुमेहाचे रुग्ण असाल किंवा तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू इच्छित असल्यास आपल्या आहारात खालील 4 डाळींचा नक्कीच समावेश करा. (हेही वाचा - World Diabetes Day 2020: दिवाळी च्या दिवशीच यंदा जागतिक मधुमेह दिन; blood-sugar levels वर या सणासुदीच्या दिवसात कसं नियंत्रण ठेवाल?)

हरभरा डाळ -

हरभऱ्याच्या डाळीत ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे. चना डाळीमध्ये 8 चे ग्लाइसेमिक इंडेक्स आहे. या डाळीत प्रथिने जास्त प्रमाणात आढळतात. तसेच फॉलीक अॅसिड देखील आढळते. यामुळे नवीन पेशी तयार करण्यात मदत होते. हरभरा डाळीमुळे विशेषत: लाल रक्ताची पेशीमध्ये वाढ होते.

मूग डाळीचं सेवन करा -

मूग डाळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यात 38 ग्लाइसेमिक इंडेक्स आहे. तसेच यात प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात, जे हृदयासाठी फायदेशीर असतात.

उडीद डाळीचे सेवन करा -

इडली, डोसा आणि सांबार बनवण्यासाठी उडीद डाळ वापरली जाते. यात ग्लायसेमिक इंडेक्स 43 आहे. यात मोठ्या प्रमाणात प्रथिने आढळतात. तसेच उडीद डाळ त्वचेसाठी फायदेशीर आहे.

छोले -

चण्यामध्ये फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. आपण मधुमेहाचे रुग्ण असल्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू इच्छित असल्यास आपल्या आहारात नक्कीच चणांचा समावेश करा.

टीप - लेखात दिलेल्या सल्ले आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. कोणताही फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आहारात बदल करण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या.