Hair Care Tips In Monsoon: पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी; 'या' सोप्या टीप्स करतील तुमच्या समस्या दूर, वाचा सविस्तर
Hair Care प्रतिकात्मक फोटो (PC- pixabay)

Hair Care In Monsoon: भारतातील अनेक राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. थोड्याचं दिवसांत मान्सून देशातील सर्व राज्यात जोरदार बरसणार आहे. पावसाळा हा ऋतू प्रत्येकाला आवडतो. परंतु या ऋतूमध्ये त्वचे संदर्भात तसेच केसांच्या विविध समस्या उद्धभवतात. पाऊस पाहून मन जितके आनंदी होतं तितकेचं घाबरून जातं की, आता आपल्या केसांचे काय होणार?

तसं पाहिलं तर पावसाळा हा आपल्या केसांच्या आरोग्यासाठी सर्वात वाईट मानला जातो. हवामानातील आर्द्रतेमुळे केस गळायला लागतात. त्यामुळे या ऋतूत केसांची चांगली काळजी घेणे खूप गरजेचे आहे. चला जाणून घेऊयात पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी काही खास टिप्स. या टिप्सचा अवलंब केल्यास तुमची पावसाळ्यात केस तुटण्यापासून आणि गळण्यापासून नक्कीच सुटका होईल. (हेही वाचा - Monsoon Health Tips: पावसाळ्यात 'या' 5 हेल्थ टिप्सचा अवलंब करून आजारांपासून रहा दूर)

केस चांगले झाकून ठेवा -

पाऊस सतत पडत नसला तरी हवामानामुळे केस गळतात. अशा परिस्थितीत केस गळण्यापासून वाचवायचे असतील तर चांगला स्कार्फ घ्या आणि डोक्याभोवती गुंडाळा. हे केवळ केसांचेच नव्हे तर टाळूचेही संरक्षण करेल.

ओले केस ताबडतोब धुवा -

पावसात केस ओले झाले तर घरी आल्यानंतर केस टॉवेलने वाळवण्याऐवजी ते धुवावेत. पावसात केस ओले झाल्याने तुमचे केस खूपच नाजूक होतात. ज्यामुळे केस गळण्याची समस्या वाढते. त्याऐवजी, केस सौम्य शाम्पूने धुणे योग्य मानले जाते.

आपत्कालीन परिस्थितीत ड्राय शॅम्पू वापरा -

तुम्ही बाहेर पडताना तुमचे केस ओले झाल्यास मिनी स्प्रे हातात ठेवा. तुमचे केस अर्ध-कोरडे झाल्यावर त्यावर ड्राय शॅम्पू स्प्रे करा. लक्षात ठेवा की, हा शॅम्पू केसांच्या मुळांवर फवारायचा नाही. त्यानंतर घरी परतल्यावर शॅम्पूने केस धुवा.

योग्य आहार घ्या -

या ऋतूत केसगळती रोखायची असेल तर जंक फूड टाळा.  तेलकट अन्न मुळात रक्ताभिसरण मंदावते आणि तुमच्या केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्याशी गडबड करते. या ऋतूमध्ये केसांना पोषण देणारे सुपरफूडचं खा.

केसांना योग्य पोषण द्या -

तुमच्या केसांना चांगले पोषण मिळावे म्हणून त्यावर हलके तेल आधारित सिरम लावा. आणि प्रत्येक 15 दिवसातून एकदा केसांचे डीप कंडिशनिंग करा. भरपूर पाणी प्या आणि जास्त प्रमाणात कॅफिन पिणे टाळा.

केस लहान ठेवा -

जर तुमचे केस मोठे असतील तर पावसाळ्यात केस लहान करा. असे केल्याने केसांची चांगली काळजी घेतली जाईल. यासोबतच केसांनाही नवा लुक मिळेल.