द लैंसेट ग्लोबल हेल्थ (Lancet Global Health) जर्नलमध्ये एक सर्वे प्रकाशित झाला आहे. या सर्वेनुसार जगभरातील कमीत कमी 3.9 मिलियन म्हणजेच 39 लाख लोकांचा मृत्यू वेळेआधी होत आहे. इंग्लंडच्या एडिनबर्ग विद्यापीठातील (University of Edinburgh) संशोधक डॉ. पॉल केली (Dr. Paul Kelly) यांनी म्हटले आहे की, लोकांची बदलती जीवनशैली, शारीरिक हालचाल कमी, मद्यपान, धुम्रपान आणि व्यायामाचा अभाव आदी कारणांमुळे नागरिकांचे आयुष्यमान कमी होत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांचा वेळेआधीच मृत्यू होतो आहे. नागरिकांनी व्यायामावर भर दिला असता त्यांचे आयुष्यमान वाढू शकते. तसेच, नैसर्गिक वेळेच्या आदी होणारा मृत्यू टाळता येऊ शकतो.
संशोधकांनी आपल्या अभ्यासात म्हटले आहे की, ज्या लोकांच्या शारीरिक हालचाली कमी प्रमाणात असतात अशा लोकांना लवकर मृत्यू येतो. संशोधकांच्या टीमने 168 देशांमध्ये प्रकाशित झालेले आकडे तपासले. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) नेही आठवड्यात कमीत कमी 150 मिनिटांच्या सरासरीत एरोबिक हालचालींची सल्ला दिला आहे. तसेच कमीत कमी 75 मिनिटे अधिक प्रमाणात होईल अशा शारीरिक हालचाली करण्याचा सल्ला दिला आहे.
जगभरातील आकडेवारीचे विश्लेषण करता संशोधकांना आढळून आले की ज्या लोकांची शारीरिक हालचाल योग्य प्रमाणात आहे अशा लोकांचे वेळेआधी मृत्यू होण्याचे प्रमाण सरासरी 15% कमी आहे. यात महिलांचे प्रमाण 14% तर पुरुषांचे प्रमाण 16% आहे. म्हणजेच साधारण 3.9 मिलियन म्हणजेच 39 लाख लोक व्यायाम करुन आपला मृत्यू पुढे ठकलू शकतात. (हेही वाचा, Suicide Prevention: WHO च्या मते महिलांपेक्षा पुरुषांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त, यामागील कारण आणि उपाय जाणून घ्या)
इंग्लंडच्या केम्ब्रिज विद्यापीठातील संशोधक टेसा स्ट्रेन यांचे म्हणने असे की, खेळ असो वा व्यायाम किवा दुपारच्या जेवनानंतर काही वेळाने जलदगतीने चालने आरोग्यसाठी अत्यंत फायदेशीर आहे. ज्यामुळे आपले आरोग्य आणि आयुष्य चांगले राहायला मदत होते.