Tips for Sleep Better at Night: रात्री चांगली झोप येण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
Tips for Sleep Better at Night (PC -unsplash)

Tips for Sleep Better at Night: झोपेचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. जर आपल्याला नीट झोप येत नसेल तर आरोग्यासोबतचं आपल्या हृदय आणि मनावरही वाईट परिणाम होतो. रात्रीची झोप पूर्ण न झाल्याने आपल्या जवळजवळ सर्व कामांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. रात्री चांगली झोप न लागणे हे सर्व आपल्या जीवनशैलीशी संबंधित काही सवयींमुळे आणि खाण्याच्या सवयींमुळे घडते. झोप न येण्याचे किंवा झोप न लागण्याचे मुख्य कारण म्हणजे तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी खात असलेले अन्न देखील असू शकते. त्यामुळे झोपण्यापूर्वी कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात. (वाचा - Lucky Fruits For Chinese New Year 2022: उसापासून सफरचंद पर्यंत, 5 फळे जी तुमची संपत्ती वाढवतील आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतील)

रात्री कॅफिनचे सेवन करू नका

कॅफिनमध्ये असे पदार्थ असतात जे आपल्याला जागे ठेवतात आणि आपला मेंदू सक्रिय ठेवतात. झोप येऊ नये यासाठी लोक अनेकदा चहा किंवा कॉफी इत्यादी कॅफिनयुक्त पेये घेतात, ज्यामुळे ते तासन्तास झोपत नाहीत. त्यामुळे झोपण्याच्या काही तास आधी कॅफिनयुक्त पदार्थ घेणे टाळा.

मर्यादित प्रमाणात कार्बोहायड्रेट्समुळे झोप येण्यास समस्या उद्भवत नाही. परंतु, याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने आपली चयापचय बदलून झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो. यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटू शकते. म्हणून, झोपेच्या आधी, तांदूळ, पास्ता, चिप्स, केळी, सफरचंद, बटाटे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे अन्नधान्य यांसारखे कार्बोहायड्रेट समृद्ध असलेले अन्नपदार्थ घेऊ नये.

प्रथिनेयुक्त पदार्थ टाळा -

झोपण्यापूर्वी मांस, कडधान्ये, मासे आणि अंडी इत्यादीसारख्या प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने झोपेमध्ये अडथळा येतो. यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर ताण येतो. त्यामुळे झोपेच्या आधी जास्त प्रथिनेयुक्त पदार्थ खाणे टाळा.

चॉकलेट टाळा -

जेवणानंतर काही लोक मिष्टान्न म्हणून चॉकलेटचा आस्वाद घेतात. चहा आणि कॉफीप्रमाणेच चॉकलेटमध्ये कॅफिनचे प्रमाण लक्षणीय असते. हे तुमचे मन गुंतवून ठेवते, याचा अर्थ तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी काही वेळापूर्वी कॅफिनयुक्त चॉकलेटचे सेवन करू नये.

टीप - या लेखात सांगितलेल्या आरोग्य टिप्स सामान्य पद्धती आणि सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. वाचकांनी त्यांचे अनुसरण करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.