
भारतातील कोविडची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. त्याबरोबर व्हेंटिलेटर बेड्स, रेमडेसिवीर आणि इतर औषधांच्या अनुपलब्धतेमुळे देश या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी झगडत आहे. अशा परिस्थितीत कोविड च्या सेफ्टी प्रोटोकॉलचे पालन करण्याव्यतिरिक्त आपल्याकडे दूसरा कोणताही मार्ग नाही. अशा वेळी घरात राहून आपण आपली इम्युनिटी सिस्टम अर्थात आपली प्रतिकार शक्ति कशी वाढवू शकतो याकडे आता नागरिक लक्ष देऊ लागले आहेत. तेव्हा आजच्या लेखात आम्ही तुंहला काही टिप्स देणार आहोत ज्याने तुमची प्रतिकारशक्ति वाढण्यास मदत होईल आणि तुम्ही कोरोनासारख्या रोगाचा सामना करू शकाल. चला तर मग पाहूयात काही टिप्स. (Betel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे )
- हायड्रेटेड रहा - सध्याच्या वातावरणात स्वतः हाला हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसभरात जास्त कोमट किंवा साधे पाणी प्या.
- योगा - दररोज योगासनाचा सराव आपल्या नित्यकर्माचा भाग बनवा. दररोज किमान 30 मिनिटे प्राणायाम आणि ध्यान करा.
- मसाल्यांचा वापर - स्वयंपाक करताना हळद, जिरे, कोथिंबीर आणि लसूण सारख्या मसाल्यांचा नियमित वापर केल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढते.
- पौष्टिक अन्न आणि पुरेशी त झोप - नेहमी हलके, सहज पचण्याजोगे आणि पौष्टिक आहार घ्या आणि जंक फूड खाणे टाळा. दररोज किमान 7-8 तास पुरेसे झोप घ्या.
- वैयक्तिक स्वच्छता ठेवा- वैयक्तिक स्वच्छता ठेवा. साबण आणि पाण्याने कमीतकमी २० सेकंदासाठी वारंवार हात धुवा, सामाजिक अंतराचा सराव करा आणि जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा मास्क वापरा.
- आयुर्वेद चवनप्राश - सकाळी 10 ग्रॅम किंवा एक चमचे च्यवनप्राश घ्या. मधुमेह असलेल्यांनी साखर मुक्त च्यवनप्राश घ्यावे.
- काढा प्या - तुळस, दालचिनी, काळी मिरी, कोरडा आले)आणि मनुका - बनविलेले हर्बल चहा किंवा डेकोक्शन (काढा ) दिवसातून एक किंवा दोन वेळा प्या. आवश्यक असल्यास गूळ घाला. दिवसातून एकदा किंवा दोनदा तुम्ही अर्धा चहा चमचा हळद पावडर घालून तयार केले दूध देखील पिऊ शकता.
- तुपाचा वापर - सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही नाकपुड्यांमध्ये तीळ तेल किंवा तूप लावण्याची सोपी आयुर्वेदिक प्रक्रिया रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करू शकते.
- आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आहारात खजूर , अंजीर, साबुदाणा, मूग डाळ, बार्ली, हंगामी भाज्यांचे सूप वगैरे खाण्याचा प्रयत्न करा.
(टीप- या लेखात दिलेल्या सर्व माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आम्ही याचा दावा करीत नाही की, लेखात दिलेली माहिती तुमच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरेल. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांशी सल्लामसलत करा)