World Health Organization (File Photo)

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने सोमवारी एक महत्वाचा अलर्ट जारी केला आहे. डब्ल्यूएचओनुसार, भारत आणि तुर्कियेच्या बाजारात बनावट लिव्हर औषधे (Fake Liver Drug) विकली जात आहेत. आता युनायटेड नेशन्सची जागतिक संघटना, डब्ल्यूएचओने आपल्या अलर्टमध्ये लोकांना कथित बनावट औषध- DEFITELIO (Defibrotide) विरुद्ध चेतावणी दिली आहे.

डब्ल्यूएचओने जारी केलेल्या अलर्टमध्ये म्हटले आहे की, ‘हा वैद्यकीय उत्पादन इशारा DEFITELIO (डिफिब्रोटाइड सोडियम) च्या बनावट बॅचच्या संदर्भात आहे. हे बनावट उत्पादन भारतात (एप्रिल 2023) आणि तुर्किये (जुलै 2023) मध्ये आढळून आले आहे आणि ते नियमन केलेल्या आणि अधिकृत चॅनेलच्या बाहेर पुरवले गेले आहे.’

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणते की, हे औषध हेमॅटोपोएटिक स्टेम-सेल ट्रान्सप्लांटेशन (HSCT) थेरपीमध्ये गंभीर यकृताचा वेनो-ऑक्लुसिव्ह रोगावर (VOD), ज्याला सायनसॉइडल ऑब्स्ट्रक्टिव्ह सिंड्रोम (SOS) म्हणूनही ओळखले जाते, उपचार करण्यासाठी वापरले जाते. हे औषध प्रौढ, पौगंडावस्थेतील मुले आणि एक महिन्यापेक्षा जास्त वयाच्या अर्भकांवरही उपचार करण्यासाठी वापरले जाते. वेनो-ऑक्लुसिव्ह रोग ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये यकृतातील शिरा ब्लॉक होतात आणि अवयव योग्यरित्या कार्य करण्यास प्रतिबंध करतात.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, अस्सल निर्मात्याने खोट्या उत्पादनाची पुष्टी केली आहे. डब्ल्यूएचओने या औषधाच्या मूळ निर्मात्याची बाजूदेखील देखील उद्धृत केली आहे. कंपनीने म्हटले आहे की, ‘लॉट 20G20A सह अस्सल DEFITELIO जर्मन/ऑस्ट्रियन पॅकेजिंगमध्ये पॅकेज केले आहे, तर खोटी उत्पादने यूके/आयर्लंड पॅकेजिंगमध्ये आहेत. यावर नमूद केलेली कालबाह्यता तारीख खोटी आहे. तसेच औषधांवर नमूद केलेला अनुक्रमांक बॅच 20G20A शी संबंधित नाही.’ सोबतच भारत आणि तुर्कियेमध्ये या औषधाची विक्री करण्याचा अधिकार कंपनीला नसल्याचेही कंपनीने म्हटले आहे. (हेही वाचा: Antacid Digene Gel Advisory: DCGI कडून अ‍ॅन्टासिड 'डायजेन जेल' औषध न घेण्याबाबत अ‍ॅडव्हायजरी जारी)

दरम्यान, डब्ल्यूएचओने या औषधाविरुद्ध अलर्ट जारी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, लाटविया, मलेशिया आणि सौदी अरेबिया सारख्या देशांमध्ये हे बनावट औषध विकले जात असल्याचे आढळले होते. त्यानंतर 7 मे 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने अलर्ट जारी केला होता.