मुंबईसह (Mumbai) उपनगरात डोळ्याची साथ (eye conjunctivitis) पसरली आहे. शहरात डोळे आलेले अनेक रुग्ण आढळून येत आहेत. नेत्रतज्ञांकडे मोठ्या संख्येने रुग्ण तपासणीसाठी येत आहे. डोळे येणे म्हणजे डोळ्यातील पांढरा भाग आणि पापणीखालील भागात पारदर्शक पडदा असतो, त्याला कॅान्जुक्टीव्ह म्हणतात. या भागाची जळजळ होते. आग होऊन डोळे चोळावेसे वाटतात.तरी अशी लक्षणे तुमच्यात किंवा तुमच्या कुटुंबात कुणालाही असल्यास लगेच नेत्र तज्ञाशी संपर्क साधा. डोळे आल्यानंतर ते नेमके कोणत्या प्रकारामुळे आले आहेत, याचे निदान करून उपचार करायला हवेत यासाठी डॉक्टरांबरोबर ताबडतोब संपर्क साधन अधिक गरजेचं आहे. जाणून घेवूया डोळे येण्याची लक्षण काय, संसर्ग कसा होतो, डोळे आल्यास काय काळजी घेणार.
डोळे येण्याची लक्षणे:-
- डोळे लाल होतात व पिवळसर द्राव डोळ्यातून येणे
- डोळे सतत चोळावेसे वाटणे
- दोन्ही डोळ्यांना एकदम सूज येणे
- पापण्या एकमेकांना चिकटणे
- डोळ्यात टोचणे
- डोळ्यातून सतत पाणी येत राहणे
डोळे येणे हे संसर्गामुळे होते. जंतू , बॅक्टेरिया (Bacteria) किंवा विषाणू (Virus) यामुळे डोळे येतात. सर्दीमुळेही डोळे येऊ शकतात आणि सर्दीमुळे डोळे येण्याच्या साथीचा प्रसारही होऊ शकतो. त्याचप्रकारे रसायने, द्रव्ये, वायू यामुळे मोठ्या प्रमाणात डोळे येतात. तरी डोळे आल्यास तीन ते चार दिवस त्याचा भर असतो वेळेत नेत्रतज्ञांकडून उपचार घेणं हा त्यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. तर दरम्यान डोळ्यांना हात नलावणं, वेगळ्या रुमालचा वापर करणं, चष्मा वापरणं, सतत डोळं धत राहणं हे यावरील प्राथमिक उपाय ठरु शकतात.