Black Tea (Photo Credits: PixaBay)

आपली जुनी पिढी म्हणजे आपले आजी-आजोबा अगदी आपले आई-बाबा काळा चहा (Black Tea) प्यायचे किंबहुना बरेच जण अजूनही पितात. मात्र सध्याच्या काळात कटिंग चहा पिणारे लोक दुधाची चहा पिणेच जास्त पसंत करतात. आपल्याला काळा चहा पिणे बेचव वाटते. पण तुम्हाला माहित आहे का गावाकडील बहुतांशी लोक कोरा चहाच पिणे पसंत करतात. कारण त्याला तशी खास कारणेही आहेत. काळाचहा हा शरीरासाठी खूप औषधी आणि गुणकारी आहेत. हा चहा अनेक आजारांवर उपाय ठरू शकतो.

काळा चहा हा दिसायला देखील बेरंग किंवा बेचव वाटत असला तरी त्याचे फायदे खूपच चांगले आणि गुणकारी आहेत. प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या व्यक्तीस हा काळा चहा खूपच फायद्याचा ठरू शकतो.

पाहा कोणते आहेत हे 6 आजार:

1. थकवा आणि अशक्तपणा दूर करतो:

गावाकडील माणसे जास्त काळा चहा पिण्याचे कारण हेच असते की चहातील विशिष्ट घटकांमुळे अंगात आलेला अशक्तपणा, थकवा दूर होतो तसेच काळ्या चहामुळे तुमच्या शरीरातील कार्यक्षमता वाढविण्यास मदत होते. दूध पिण्याआधी चुकूनही खाऊ नका या '5' गोष्टी, शरीरावर होऊ शकतो विपरित परिणाम

2. मधुमेह:

मधुमेहा हा रोग साधारण 40-50 वर्षांनतर सर्वच लोकांमध्ये आढळतो. अशा लोकांना काळा चहा पिण्याने यातील पॉलीफेनॉल्समुळे इन्सुलिनच्या संवेदनशीलतेत सुधारणा होऊन मधुमेहासारख्या आजाराला लांब ठेवू शकतो.

3. फुफ्फुसाचा कर्करोग:

सिगारेट आणि अन्य व्यसनांमुळे फुफ्फुसाच्या कर्करोगावर काळा चहा वरदान ठरु शकतो. नियमित काळा चहा प्यायल्यामुळे कर्करोग टाळता येऊ शकतो.

4. मुतखडा:

मुतखडा हा आजकाल अनेक तरुण-तरुणींमध्येही पाहायला मिळतो. अशा लोकांनी नियमितपणे काळा चहा प्यायल्यास तुम्हाला किडनी स्टोन होण्याची शक्यता 8% कमी होते.

हेदेखील वाचा- ज्वारीची भाकरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे

5. पोटाचे विकार:

काळा चहा प्यायल्याने अॅसिडीटीचा त्रास कमी होतो. तसेच पचनक्रिया सुरळीत होऊन पोटाचे विकार कमी होतात. उलट्या, मळमळ होत असल्यास काळा चहा रामबाण उपाय ठरु शकतो.

6. हृद्याचे आजार:

नियमितपणे काळा चहा प्यायल्यामुळे हृदयाच्या धमण्यांची कार्यक्षमता वाढते आणि धमणी आकुंचन पावण्याची शक्यताही खूप कमी होते. त्यामुळे हृदयाशी निगडीत आजार कमी होण्यास मदत होते.

तुम्हाला जर या आजारांपासून स्वत: चा बचाव करायचा असेल तर तुम्ही आजपासूनच काळा चहा पिण्यास सुरुवात करायला काही हरकत नाही.