दूध पिण्याआधी चुकूनही खाऊ नका या '5' गोष्टी, शरीरावर होऊ शकतो विपरित परिणाम
Milk (Photo Credits: PixaBay)

आपल्या सर्वांना माहितच आहे की दूधामध्ये व्हिटामिन, खनिज, प्रोटीन आणि अँटी ऑक्सिडंट असते. यामुळे आपली हाडे मजबूत होतात. त्यामुळे दररोज दूध (Milk) प्यायल्याने आवश्यक असे घटक शरीरात पोहोचतात. यामुळेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश असणे अत्यंत आवश्यक आहे. पण हे दूध पिण्याचे काही नियम आहेत. दूध पिण्याआधी अशा ब-याच गोष्टी आहेत ज्या खाणे अथवा पिणे हे शरीरासाठी घातक ठरू शकते. आधी म्हटल्याप्रमाणे दूधामध्ये शरीरास उपयुक्त असे अनेक महत्वपूर्ण घटक आहेत, ज्याचा शरीराला खूप फायदा होऊ शकतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे दूध प्यायल्याने शरीराला कॅल्शिअम मिळते ज्यामुळे आपल्या शरीराचे स्नायु बळकट होण्यास मदत होते. मात्र पुढे दिलेल्या गोष्टी जर दूध पिण्याआधी सेवन केल्या तर त्याचा तुमच्या शरीरावर आणि स्नायूंवर विपरित परिणाम होऊ शकतो.

1. दूध पिण्याआधी कारलं किंवा भेंडी खाऊ नका:

दूध पिण्याआधी कारलं किंवा भेंडी खाल्ल्यास चेह-यावर काळे डाग येण्याची शक्यता असते. याशिवाय चेहरा काळा पडू शकतो. चेह-यावर एलर्जी होऊ शकते.

2. आंबट फळे खाऊ नका:

दूध पिण्याआधी आणि प्यायल्यानंतर आंबट फळे खाऊ नका. असं केल्यास तुम्हाला उलटी होऊ शकते. यासोबत पोटासंबंधीचे अनेक आजार होण्याची शक्यता असते.

हेदेखील वाचा- World Breastfeeding Week: स्तनपान करताना काय काळजी घ्यावी, जाणून घ्या सविस्तर

3. मुळा किंवा जांभूळ खाऊ नये:

मुळा किंवा जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नये. असं केल्यास तुम्हाला त्वचेशी निगडीत अनेक आजार होऊ शकतात. चेहऱ्यावर खाज येण्यापासून चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात.

4. मासे खाल्यानंतर दूध पिऊ नका:

मासे खाणं हे शरीरासाठी फार फायदेशीर आहे हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. त्वचा आणि केसांसाठी फार फायदेशीर आहे. मात्र मासे खाल्ल्यानंतर लगेच दूध पीणं शरीरासाठी धोकादायक आहे. असं केल्यास अपचनाचा त्रास होऊ शकतो यासोबतच पोटाचे अनेक विकार होऊ शकतात. एवढंच नाही तर काही वेळा फूड पॉयझनिंगही होऊ शकतं.

5. उडदाची डाळ खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये:

उडदाची डाळ खाल्ल्यानंतर दूध प्यायल्यास अपचनाचा त्रास होतो. दोन्ही गोष्टी एकाचवेळी घेणं हे शरीरासाठी धोकादायक आहे. ही डाळ खाल्ल्यानंतर दूध प्यायल्यास पोट दुखी, उल्टी आणि शरीर जड वाटणं यांसारखे त्रास होतात.

दूध हे एक असे पेय आहे जे आपल्या आहारात समावेश केल्यास आपल्या शरीरावर त्याचे फायदेशीर बदल होतात. म्हणून लहान मुलांच्या आहारातही दूधाचा समावेश शक्य तितक्या जास्त प्रमाणात झाला पाहिजे. पण या काही महत्त्वाची गोष्टी लक्षात घेऊनच.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे.  यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)