Dark Chocolate | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

Reduce Risk of Diabetes Risk? डार्क चॉकलेट म्हटले की अनेकांच्या जिभेवर एक कडवटपणा आणि दीर्घकाळ राहणारी चव आठवते. पण, असे असले तरी, हे चॉकलेट केवळ चवीसाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. हार्वर्ड द्वारे नुकताच एक अभ्यास (Harvard Study) प्रकाशित झाला. ज्यामध्ये म्हटले आहे की, डार्क चॉकलेटच्या नियमित सेवनाने टाइप 2 मधुमेह (Type 2 Diabetes) होण्याचा धोका 21% पर्यंत कमी होऊ शकतो. हार्वर्ड येथील संशोधक T.H. चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थला संशोधनात हा एक वेगळाच निष्कर्ष काढता आला.

डार्क चॉकलेट आणि दुधाच्या चॉकलेटमधील मुलभूत फरक

हार्वर्डतील अभ्यासात डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेटमधील मोठा फरक अधोरेखित केला आहे. डार्क चॉकलेटचे वाढते सेवन हे टाइप 2 मधुमेहाच्या कमी जोखमीशी संबंधित होते, तर दुधाच्या चॉकलेटचे जास्त सेवन हे दीर्घकालीन वजन वाढण्याशी संबंधित होते. हार्वर्डमधील पोषण आणि साथीच्या रोगाचे सहयोगी प्राध्यापक क्यूई सन म्हणाले की, "मधुमेहाचा धोका आणि वजन व्यवस्थापनावर डार्क आणि मिल्क चॉकलेटचा परिणाम यांच्यातील स्पष्ट विभाजन पाहून आम्हाला आश्चर्य वाटले." दरम्यान, कॅलरी आणि संतृप्त चरबीचे समान प्रमाण असूनही, डार्क चॉकलेटचे समृद्ध पॉलीफेनॉल घटक वजन आणि मधुमेहावर साखर आणि चरबीच्या परिणामांचा प्रतिकार करू शकतात, असे संशोधकांनी स्पष्ट केले. (हेही वाचा, Child Obesity Crisis: महाराष्ट्रातील इयत्ता 7 वी ते 9 वी मधील तब्बल 16.66% मुले लठ्ठ; टाईप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब-कोलेस्टेरॉलसह अनेक आरोग्य समस्या निर्माण होण्याचा धोका)

डार्क चॉकलेट का?

डार्क चॉकलेटमध्ये पॉलिफेनॉल्स असतात, जी संयुगे त्यांच्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मांसाठी ओळखली जातात. हे इन्सुलिनची संवेदनशीलता नियंत्रित करण्यास आणि मधुमेह प्रतिबंधात महत्त्वपूर्ण घटक असलेल्या कारणांचा सामना करण्यास मदत करू शकतात. दुसरीकडे, दुधाच्या चॉकलेटमध्ये समान पॉलीफेनॉलचे प्रमाण नसते आणि त्यात अनेकदा अधिक साखर आणि चरबी असते. (हेही वाचा, Diabetes Control Through Chewing Properly: आहार योग्य प्रमाणात चावून खाऊ शकणाऱ्या लोकांमध्ये मधुमेहाचे प्रमाण असते कमी, Study नवी माहिती आली पुढे)

आशादाई चित्र

आरोग्यदायी अन्न म्हणून चॉकलेटची कल्पना जरी खूप चांगली वाटत असली, तरी हे संशोधन संयम आणि गुणवत्तेवर भर देते. दुधाच्या चॉकलेटऐवजी गडद चॉकलेटची निवड करणे हे चांगल्या आरोग्याच्या दिशेने एक लहान परंतु प्रभावी पाऊल असू शकते, विशेषतः मधुमेह आणि वजन व्यवस्थापनाबद्दल चिंतित असलेल्यांसाठी.

सावधानतेचा इशारा

संशोधकांनी इशारा दिला की, डार्क चॉकलेट हे टाईप टू प्रकारातील मधुमेहावर गुणकारी ठरु शकत असले तरी, त्याचा फायदा व्यक्तीसापेक्ष असू शको. प्रत्येक व्यक्तीला त्याचा वेगवेगळा फरक पाहायला मिळू शकतो. त्यामुळे कोणतीही कृती करताना वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे. तसेच, हे निष्कर्ष जास्त प्रमाणात चॉकलेटचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना लागू होणार नाहीत. अभ्यासात सहभागी झालेल्यांचे चॉकलेटचे सेवन सामान्य होते, जे सामान्य राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूपच कमी होते. या निष्कर्षांची पुष्टी करण्यासाठी आणि त्यामागील यंत्रणा समजून घेण्यासाठी आणखी यादृच्छिक (Random) नियंत्रित चाचण्या आवश्यक आहेत", असा निष्कर्ष अभ्यासाने काढला.