Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

Covaxin Doses: पुढील वर्षाच्या सुरुवातीस, कोवॅक्सीनचे 50 दशलक्ष डोस (Covaxin Doses) कालबाह्य होतील. स्वदेशी लस बनवणारी भारत बायोटेक (Bharat Biotech) ही देशातील पहिली कंपनी आहे. मागणीअभावी भारत बायोटेकने या वर्षाच्या सुरुवातीला कोवॅक्सिनचे उत्पादन बंद केले. यापूर्वी, कंपनीने गेल्या वर्षाच्या अखेरीस एक अब्ज वार्षिक उत्पादन क्षमता गाठली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत बायोटेककडे लसीचे 200 दशलक्षपेक्षा जास्त डोस आहेत. यातील 50 दशलक्ष डोस लवकरचं कालबाह्य होणार आहेत. या डोसची मुदत संपल्याने कंपनीचे नुकसान होणार आहे. मात्र, यामुळे कंपनीचे किती नुकसान होईल, याची अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात शनिवारी 1,082 नवीन कोविड-19 प्रकरणे नोंदवली गेली. तर सक्रिय प्रकरणांची संख्या 15,200 वर आली आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, कोविड-19 लसींचे 219.71 कोटी डोस आत्तापर्यंत देण्यात आले आहेत. जागतिक स्तरावर संसर्गाचे प्रमाण झपाट्याने कमी होत असल्याने परदेशातून लसीच्या निर्यातीवर वाईट परिणाम झाला आहे. (हेही वाचा -African Swine Fever in Karnataka: कर्नाटकातील डुकरांमध्ये आढळला आफ्रिकन स्वाइन फ्लू; प्रशासन सतर्क, विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न सुरू)

जागतिक पातळीवर कोविडचा धोका कमी झाला आहे. यावर्षी एप्रिलमध्ये, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सांगितले की त्यांनी UN खरेदी संस्थांद्वारे लसीचा पुरवठा स्थगित केल्याची पुष्टी केली आहे. भारत बायोटेकने 23 जुलै 2021 रोजी सांगितले की, ब्राझीलच्या बाजारपेठेसाठी प्रिसिसा मेडिकामेंटोस आणि एनविक्सिया फार्मास्युटिकल्स LLC.C सह कोविड-19 लस Covaxin साठी केलेले सामंजस्य करार त्यांनी रद्द केले.

दरम्यान, डिसेंबर 2021 मध्ये, भारत बायोटेकने सांगितले की, सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने त्यांच्या COVID-19 लस कोवॅक्सीनचे शेल्फ लाइफ उत्पादनाच्या तारखेपासून 12 महिन्यांपर्यंत वाढवण्यास मान्यता दिली आहे.