Coronavirus Testing: कोविड-19 'Gargle and Spit' टेस्ट म्हणजे काय? जाणून घ्या चाचणीच्या या पद्धतीबद्दल सविस्तर
Coronavirus (Photo Credits: PTI)

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा  (Coronavirus) संसर्ग देशभरातही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दरम्यान, कॅनडामध्ये कोविड-19 ची चाचणी (Covid-19 Testing) करण्याची वेगळी पद्धत वापरली जात आहे. कोलंबिया देशातील शाळांमध्ये शिशू वर्गापासून 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची तपासणी करण्यासाठी या नव्या टेस्टिंग पद्धतीचा वापर केला जात आहे. तर आता भारतातही 'गार्गल अँड स्पिट' (Gargle And Spit Test) कोविड-19 टेस्टला प्राधान्य दिले जात आहे. पीसीआर नेजल स्वॅब (PCR Nasal Swab) ऐवजी लहान मुलांचे सॅपल टेस्ट करण्यासाठी ही पद्धत अतिशय सोपी आणि सोयीस्कर ठरत आहे. (Covid-19 Testing: गुळण्या केलेले पाणी हा कोविड-19 चाचणीसाठी एक पर्याय असू शकतो- ICMR)

गार्गल अँड स्पिट टेस्ट?

गार्गल अँड स्पिट टेस्ट करण्यासाठी सलायन सोल्यूशन म्हणजेच मिठाचे पाणी काही वेळासाठी तोंडात धरुन गुळण्या करुन एका लहान ट्युब मध्ये थुंकण्यास सांगितले जाते. लहान मुलांची टेस्ट करताना कमीत कमी 30 सेकंदासाठी गार्गल करणे आवश्यक आहे. त्यामुळे कोविड-19 टेस्ट साठी आवश्यक टिश्यू कलेक्ट केले जातात. ब्रिटिश कोलंबिया सेंटर फॉर डिसीज कंट्रोलनुसार (British Columbia Center for Disease Control) गार्गल अँड स्पिट टेस्ट ही टेस्ट पीसीआर नेजल स्वॅब टेस्ट पेक्षा लहान मुलांसाठी अधिक सोयीस्कर आहे.

टेस्ट करण्यापूर्वी घ्यायची खबरदारी:

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टेस्ट करण्यापूर्वी काही खाणे किंवा पिणे टाळले पाहिजे. त्याचप्रमाणे ब्रश करणे, माऊथ वॉश किंवा च्युईंगमचा वापर देखील टाळायला हवा. दरम्यान, एखाद्या मुलाला गार्गल अँड स्पिट टेस्ट करण्यास सक्षम नसल्यास किंवा सॅपल चुकीचे आहे, असे वाटल्यास नोजल स्वॅब टेस्ट करण्यात येते.

गार्गल अँड स्वॅब टेस्टचे फायदे:

कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे चाचणी केंद्रांवरील ताणही वाढत आहे. हा वाढता ताण कमी करण्यासाठी टेस्टिंगच्या या पद्धतीचा वापर नक्कीच फायदेशीर ठरेल. तसंच कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासही मदत होईल. महाराष्ट्रातही काही दिवसांत शाळा-महाविद्यालयं सुरु होतील. त्यावेळेस ही टेस्टिंगची पद्धत कामी येईल. विशेष म्हणजे ही टेस्ट क्लिनिकल एक्सपर्ट किंवा आरोग्यतज्ञांशिवाय अगदी सहज होऊ शकते.