Coronavirus Study: कोरोना विषाणू वर मात देऊन बरे झालेल्या रुग्णांमध्ये तीन महिन्यानंतर आढळल्या फुफ्फुसांच्या समस्या
Coronavirus (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर इतका वाढला आहे की, आता ब्राझीलला मागे टाकून भारत सध्या दुसऱ्या क्रमांकावरील देश बनला आहे. सध्या या विषाणूबाबत अनेक देशांमध्ये अभ्यास चालू आहे. आता एका अभ्यासानुसार असे आढळले आहे की, कोरोना व्हायरसने संक्रमित रुग्ण बरा होऊन रुग्णालयातून घरी परतल्यानंतर तीन महिन्यांनंतरही त्याला फुफ्फुसांच्या समस्येचा (Lung Problems) त्रास होत आहे. कोरोना विषाणूमुळे ग्रस्त असलेल्या रुग्णाची प्रकृती सहसा सहा आठवड्यांत सुधारते, परंतु संशोधकांना असे आढळले आहे की, काहींना बराच काळ श्वास घेण्यास त्रास होत आहे आणि काहींना बराच काळ खोकल्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.

कोरोनो व्हायरस रूग्णांना ऑस्ट्रियाच्या (Austria) टायरोलियन प्रांतातील (Tyrolean Region) विविध संस्थांमधील संशोधकांनी रुग्णालयात दाखल केले होते. हे असे रुग्ण होते ज्यांना कोरोना व्हायरस झाला होता व त्यांना बरे होऊन 6, 12 आणि 24 आठवड्यांनंतर मूल्यांकन करण्यासाठी परत रुग्णालयात दाखल केले गेले. मूल्यमापनाच्या वेळी संशोधकाला असे आढळले की, निम्म्याहून अधिक रुग्णांना कमीतकमी एक लक्षण सतत जाणवले आहे. या रुग्णांमध्ये, प्रामुख्याने श्वास घेण्याचा त्रास आणि खोकला जाणवत होता. सीटी स्कॅनमध्ये तर 88 टक्के रुग्णांमध्ये फुफ्फुसांचा त्रास दर्शवला. (हेही वाचा: देशात 32 लाखाहुन अधिक रुग्ण कोरोना मुक्त, रिकव्हरी रेट 77.31 टक्के- आरोग्य मंंत्रालय)

रुग्णांच्या पहिल्या तपासणीच्या वेळी संशोधकांना असे आढळले की, अर्ध्याहून अधिक रुग्णांमध्ये एकच लक्षण अधिक काळ आढळून आले आहे. या रुग्णांमध्ये श्वासोच्छवासाची समस्या कायम होती, त्यांना कफची समस्या अजूनही आहे. या सर्व रूग्णांपैकी 88 टक्के रुग्णांच्या फुफ्फुसांचे नुकसान झाले आहे. या रुग्णांच्या दुसऱ्या भेटीत, त्यांच्यात बरीच सुधारणा दिसून आली, परंतु 56 टक्के रुग्णांना त्यांच्या फुफ्फुसात समस्या होती. या संशोधनाशी संबंधित सबीना सहिक म्हणाल्या की कोविड-19 मधून बरे झालेल्या रूग्णांना रुग्णालयातून गेल्यानंतर अनेक आठवड्यांनंतरही बऱ्याच समस्या भेडसावत आहेत, मात्र त्यामध्ये हळू हळू फारक पडत असल्याचेही जाणवले आहे.