Coronavirus In India | | (Photo Credits: Pixabay | Archived, edited, symbolic images)

Coronavirus Update In India: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry)  दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात सलग दुसर्‍या दिवशी देशात 90,802 नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत, यानुसार भारतामध्ये कोरोनाबाधितांचा एकूण आकडा (Coronavirus Total Cases)  42 लाखांच्या पार गेला आहे. देशात एकूण 42,04,614 जणांना आतापर्यंत कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. हा आकडा निश्चितच चिंंताजनक असला तरी देशातील कोरोनाचा रिकव्हरी रेट (COVID 19 Recovery Rate) सुद्धा तितकाच दिलासादायक आहे.प्राप्त माहितीनुसार कालच्या दिवसभरात देशात 69,564 जणांंनी कोरोनावर मात केली आहे. यानुसार आतापर्यंतच्या कोरोना रिकव्हर रुग्णांंचा आकडा 32.5 लाखाच्या वर गेला आहे. सध्या भारताचा कोरोना रिकव्हरी रेट हा 77.31% इतका आहे.

COVID-19 Testing: प्रिस्क्रिप्शन शिवाय On-Demand कोरोना चाचणी करता येणार; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून टेस्टिंग नियमात मोठा बदल

दुसरीकडे, कालच्या दिवसभरात कोरोनामुळे 1016 जणांचा मृत्यू नोंदवण्यात आला आहे. देशामध्ये कोरोना व्हायरसमुळे बळी गेलेल्यांची संख्या 71,642 आहे. तर याशिवाय 8,82,542जणांवर देशभर उपचार सुरू आहेत.

ANI ट्विट

दरम्यान, देशात हैदराबाद स्थित भारत बायोटेक कंंपनीची कोरोनावरील लस कोव्हॅक्सिन (COVAXIN) च्या मानवी चाचणीचा (Clinical Trials) दुसरा टप्पा आज पासुन सुरु होणार असल्याचे समजत आहे. कोव्हॅक्सिनचे पहिल्या चाचणीतील रिझल्ट समाधानकारक असुन आजपासुन 380 नव्या प्रतिनिधींंवर चाचणी होणार आहे.