COVID-19 Testing: प्रिस्क्रिप्शन शिवाय On-Demand कोरोना चाचणी करता येणार; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून टेस्टिंग नियमात मोठा बदल
COVID 19 Testing (Photo Credits: Pixabay)

देशातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे कोविड-19 (Covid-19) चा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी भारत सरकारने कोरोना टेस्टिंगच्या नियमांमध्ये बदल केला आहे. पूर्वी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन (Prescription) शिवाय कोरोनाची चाचणी करता येत नव्हती. परंतु, आता या नियमामध्ये बदल करण्यात आला आहे. आता कोरोना चाचणी प्रिस्क्रिप्शनशिवायही करता येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) कोविड-19 टेस्टिंगची नियमावलीत हे नवे अपडेट लागू केले आहे. या नव्या अपडेटनुसार, ऑन डिमांड टेस्टिंग (On-Demand Testing) करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रवासादरम्यानही कोरोना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

दरम्यान या नव्या नियमानुसार, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोरोना टेस्टिंग करु शकता. त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज भासणार नाही. त्याचप्रमाणे प्रवासदरम्यान टेस्ट करु घ्यावी असे वाटल्यास तुम्ही तुमच्याकडे ऑन-डिमांड टेस्टिंगचा पर्याय खुला आहे. (Coronavirus: देशातील 62% कोरोना व्हायरस संक्रमित केवळ 5 राज्यांमध्ये;महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक अग्रक्रमांकावर)

ANI Tweet:

कोरोनाची काही लक्षणे आढळल्यास ती व्यक्ती चाचणी करु शकते. मागील 14 दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवास केला आहे. त्यातील लक्षणं नसणाऱ्या व्यक्ती देखील खबरदारी म्हणून कोरोना टेस्ट करु शकतात. किंवा प्रवास करण्यापूर्वी चाचणी करण्याची इच्छा असल्यास तुम्ही कोरोना चाचणी आता अगदी सहज करु शकता. दरम्यान एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करण्यासाठी कोरोना निगेटीव्ही असणे अनिवार्य आहे. यासाठी आरोग्य विभागतर्फे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि ट्रॅकिंगची मदत घेतली जाणार आहे.

दरम्यान देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने 40 लाखांचा टप्पा पार करत 4023179 चा आकडा गाठला आहे. त्यापैकी 846395 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर 3107223 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील एकूण बळींची संख्या 69561 वर पोहचली आहे.