भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने परसत चालल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. रुग्णालयांत बेड्स, ऑक्सिजन आणि औषधांच्या तुटवड्यामुळे उपचार घेणे मुश्किल झाले आहे. दरम्यान एक्सपर्ट्स कडून काही वेळा असे ही सांगण्यात आले आहे की, हलकी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी सेल्फ आयसोलेशन मध्ये राहू शकतात. यासाठी घरात राहून सुद्धा आजाराची काही लक्षणे जाणून घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे.(Mucormycosis Precaution Tips: मधुमेह नियंत्रणात ठेवा, स्टेरॉइड्सचा वापर योग्य प्रमाणात करा, स्वच्छता राखा, स्वयं उपचार करू नका - म्युकरमायकोसिसपासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारचा सल्ला)
नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे निर्देशक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी काही विशेष गोष्टी या आरोग्य मंत्रालयाच्या ट्विटर हँडलवरुन सांगितल्या आहेत. यामध्ये लोकांना अपील केले आहे की, त्यांनी तातडीने रुग्णालयाच्या दिशेने धावत जाण्यापेक्षा आजाराच्या वॉर्निंग लक्षणे समजून घ्या आणि गरज भासल्याच तरच रुग्णालयात जा. डॉ. गुलेरिया यांनी असे ही म्हटले की, लोकांना कोरोनाच्या लक्षणांबद्दल माहिती असले पाहिजे. जर तुम्ही होम आयसोलेशमध्ये असाल तर सातत्याने डॉक्टरांच्या संपर्कात रहा. प्रत्येक राज्यात हेल्पलाइन सुविधा तयार करण्यात आली असून तेथे रुग्णाला कधीही फोन करुन माहिती मिळू शकते.
तर एखाद्या रुग्णाचे सॅच्युरेशन 93 किंवा त्यापेक्षा ही कमी असल्यास आणि खुप ताप, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, सुस्ती किंवा अन्य गंभीर लक्षणे दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांना संपर्क साधा किंवा रुग्णालयात जा.अशा स्थितीत घरी राहणे उत्तम राहणार नाही. रुग्णाला वेळेवर औषध दिली नाही तर धोका अधिक वाढू शकतो. तसेच रिकव्हरी रेट उत्तम असला तरीही रुग्णालयात बेड्स किंवा ऑक्सिजन संबंधित ज्या समस्येचा सामना आम्ही केला होता तो आता अत्यंत कंट्रोल मध्ये आला आहे. राज्य आणि केंद्र सरकारने काही रुग्णालय सुद्धा सुरु केली आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यात आला आहे. काही ठिकाणी कॅम्प सुद्धा लावण्यात आले असून तेथे रुग्ण आरामात जाऊ शकतात.
डॉ. गुलेरिया यांनी स्टेरॉइडच्या ओव्हरडोस संबंधित सुद्धा अलर्ट केले आहे. त्यांनी असे म्हटले की, स्टेरॉइडच्या ओव्हरडोसमुळे रुग्णांना नुकसान होऊ शकते. खासकरुन याचा वापर आजाराच्या सुरुवाती स्टेजमध्ये केला जातो. यामुळे फुफ्फुसावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यांनी कोविड इंफेक्शनच्या दरम्यान औषधांचा दुरुपयोग करण्यापासून वॉर्न केले आहे. लोकांना असे वाटते की, रेमिडेसिव्हर आणि अन्य प्रकारचे स्टेरॉइड रिकव्हर होण्यास मदत करतात. मात्र लोकांना हे नाही माहिती की, याची गरच नेहमीच भासत नाही. या प्रकराची औषधे किंवा स्टेरॉइड फक्त डॉक्टरांच्या सल्ल्याने दिले जाऊ शकतात.
यापूर्वी गुलेरिया यांनी म्हटले होते की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वैज्ञानिकांना आधीपासूनच अंदाज होता. तर व्हायरस म्युटेट होऊन ऐवढा इंफ्केशियस असेल याची माहिती कोणालाच नव्हती. भारतात प्रतिदिन चार लाख रुग्ण आढळण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. रुग्णांचा आकडा ऐवढ्या वेगाने वाढेल हे सुद्धा माहिती नव्हते.(कोरोना विषाणू पुरुषांच्या सेक्स हॉर्मोन्स वर करतोय परिणाम; अभ्यासातून आली धक्कादायक माहिती समोर)
कोरोनाची रुग्णसंख्या गेल्यावेळी मंद गतीने वाढत होते. त्यामुळे हेल्थ केअर सिस्टिम तयार करण्यासाठी वेळ मिळाला होता. मात्र जेव्हा ही रुग्णसंख्या अचानक वाढून तीन-चार लाखांवर पोहचली तेव्हा रुग्णालयांवरील ताण अधिक वाढला. आयसीयु बेड, ऑक्सिजन आणि औषधांच्या कमतरतेमुळे स्थिती गंभीर होत गेली. कोरोनाची दुसरी लाट ऐवढ्या वेगाने आली की, देशातील हेल्थ केअर सिस्टिम तयार करण्यासाठी जरा सुद्धा वेळ मिळाला नाही. आता सर्व रुग्णालये या संबंधित गांभीर्याने काम करत आहेत. जेणेकरुन अधिकाधिक रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात. रुग्णांनी सुद्धा लक्षणे जाणून घेत सेल्फ आयसोलेड होण्याची सुद्धा गरज आहे.