औषधांचे साईड इफेक्ट माहिती पत्रकात संगणे औषध कंपन्यांवर बंधनकारक
Antibiotics | (file photo)

कोणतेही प्रतिजैवक (Antibiotics)अथवा मानसिक आजारांवरील उपचारासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांच्या दुष्परीणामांबाबत स्पष्ट माहिती देणे औषध कंपन्यांवर बंधनकारक करण्यात आले आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (Drug Controller General of India) ने ड्रग कंट्रोलर्सना या विषयी पत्र लिहून स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच, औषधांच्या दुष्परीणामांबाबतची सर्व माहिती औषधा सोबतच्या माहितीपत्रकात रुग्णाला समजेल अशा शब्तात स्पष्ट लिहीण्यात येवेत असेही डीसीजीआयने म्हटले आहे.

डीसीजीआयने आपल्या पत्रात म्हटले आहे की, जर एखाद्या औषधाच्या साईड इफेक्टबाबत (दुष्परीणाम) माहिती नव्याने माहिती मिळाली असेल तर, तीसुद्धा औशधासोबतच्या पत्रकात नमूद करण्यात यावी. औषधांचे साईड इफेक्ट याबबत इंडियन फार्माकोपिया कमिशनने केलेल्या एका अभ्यासानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.

इंडियन फार्माकोपिया कमिशनने सरकारला इनेक औषधांच्या साईड इफेक्टबाबत माहिती दिली आहे. कंपन्यांनी आपल्या लीफ्लेटमध्ये या दुष्परीणामांबाबत (साईड इफेक्ट) कोणत्यीही प्रकारे माहितीचा उल्लेख केला नसल्याचे फार्माकोपियाच्या अभ्यासात पुढे आले. दरम्यान, औषधांच्या दुष्परीणामांबाबत माहिती देण्यासाठी किमिशनने एक अॅपही सुरु केले आहे. ज्यावर केवळ डॉक्टरच नव्हे तर, डॉक्टरसोबतच इतर कोणताही व्यक्ती संबंधित औषधाच्या साईड इफेक्टबाबत माहिती देऊ शकतो. (हेही वाचा, सॅरिडॉन, डिकोल्ड, विक्स अॅक्शन-५०० सह तब्बल ३२८ औषधांवर बंदी)

फार्माकोपिया कमिशनने अँटीबायोटीक औषधे, सीफोटॅक्सिम, सॅफिग्जाइम, ओफ्लॉक्सासिन आणि मानसिक आजारांवरील उपचारासाठी अनेकदा सूचवण्यात येणारी क्वीटिआपाइन औषधांच्या दुष्परीणामांबाबत केद्र सरकारला माहिती दिली होती.