चीन मध्ये कोरोना व्हायरसचे थैमान, गेल्या 24 तासात 38 नागरिकांचा मृत्यू
Coronavirus outbreak | photo used for representation Purpose (Photo Credits: Pixabay)

चीन (China)  येथील वुहान शहरातील कोरोना व्हायरचे जाळे अधिक वेगाने वाढत चालले आहे. या व्हारसची लागण होऊन मृतांचा आकडा 170 वर पोहचला आहे. तर गेल्या 24 तासात 38 नागरिकांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. चीन येथून मायदेशी परतणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवले जात असून जेणेकरुन या व्हायरची लागण होऊ नये. WHO यांच्या अधिकाऱ्यांनी चीन येथून बाहेर जाणाऱ्या नागरिकांमध्ये कोरोना व्हायरस पसरत चालल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

गुरुवारी गेल्या आठवड्यात 24 तासात कोरोना व्हायरसमुळे मृतांची संख्या 38 झाली आहे. तर या व्हायरची लागण झाल्याची 1737 नवी प्रकरणे समोर आली आहेत. आतापर्यंत 7711 कोरोना व्हायरची लागण झाल्याची बाब उघड झाली आहे. वुहान शहरातून 195 अमेरिकन नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. मात्र या सर्व व्यक्तींमध्ये कोरोना व्हायरची कोणतेही लक्षणे दिसून आली नाही आहेत.(Coronavirus याची चीन मध्ये झपाट्याने वाढ)

डब्लूएचओ मधील आपत्कालीन प्रमुखांनी असे म्हटले आहे की, चीनच्या बाहेर जपान, कनाडा आणि वियतनाम येथे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला कोरोना व्हायरची लागण होत आहे. कोरोना व्हायरस याची लक्षणे म्हणजे प्रामुख्याने सर्दी, तापाची लक्षणं सुरवातीच्या टप्यात दिसतात. त्यानंतर श्वसनामध्ये त्रास जाणवू लागल्याने अनेकांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. कोरोना विषाणू पहिल्यांदा डिसेंबर 2019 महिन्यात चीनमधील वुहान मध्ये आढळला त्यानंतर तो बिजिंग आणि इतर शहरामध्ये पसरत आहे. 9 जानेवारी दिवशी WHO ने वुहानमध्ये यापूर्वी कोरोना विषाणूच्या अज्ञात प्रकाराने पसरवलेल्या विषाणू मुळे होत असल्याचं स्पष्ट केलं आहे. यामध्ये सामान्य सर्दी-पडसं ते सार्स सारख्या गंभीर आजाराची लक्षणं दिसून येत आहेत.