चीन मध्ये वुहान शहरात कोरोना व्हायरस झपाट्याने वाढत चालला आहे. या व्हायरसची लागण झाल्याने आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. यामधील आता 830 प्रकरणांची पुष्टी केली आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोग यांच्या मते निमोनियाच्या स्थितीत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. यामधील मध्य चीन येथील हुबेईत 24 आणि उत्तर भागातील हैबेत एकाचा मृत्यू झाला आहे. गुरुवार पर्यंत चीनमधील 19 शहरात कोरोना व्हायरसच्या कारणामुळे 830 निमोनियाची प्रकरणी समोर आली आहेत. या वाढत्या व्हायरसवर अद्याप कोणतेही ठोस उपचार झाले नसून याची लागण कोणत्या माध्यमातून होतेय याचा तपास केला जात आहे. तर कोरोना व्हायरस हा सापामुळे पसरत चालल्याचे त्याची लागण लोकांना होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. याबाबात जर्नल ऑफ मेडिकल वायरॉलजी मधून अधिक माहिती दिली आहे.
कोरोना व्हायरसमुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आरोग्य मंत्रालयाकडून नागरिकांना अलर्ट करण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक परिवहनावर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. वुहान शहरात 62 रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे दिसून आले. दोन दिवसांपूर्वी भारतामधील एक शिक्षिका चीन मधील कोरोनाच्या संपर्कात आली. याची माहिती मिळताच तातडीने केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाच्या सचिव प्रीति सूदन यांनी अलर्ट जाहीर केला. चीन येथून येणाऱ्या प्रवाशांची पूर्णपणे तपासणी करण्यात यावी असे निर्देशन आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आले आहे.(Coronavirus ची लागण चीन पाठोपाठ जपान आणि अमेरिका पर्यंत पोहचली; जाणून या आजारा विषयी खास माहिती)
PTI Tweet:
Death toll in China’s coronavirus climbs to 25 with 830 confirmed cases:Health authorities
— Press Trust of India (@PTI_News) January 24, 2020
कोरोना व्हायरस याची लक्षणे म्हणजे प्रामुख्याने सर्दी, तापाची लक्षणं सुरवातीच्या टप्यात दिसतात. त्यानंतर श्वसनामध्ये त्रास जाणवू लागल्याने अनेकांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. कोरोना विषाणू पहिल्यांदा डिसेंबर 2019 महिन्यात चीनमधील वुहान मध्ये आढळला त्यानंतर तो बिजिंग आणि इतर शहरामध्ये पसरत आहे. 9 जानेवारी दिवशी WHO ने वुहानमध्ये यापूर्वी कोरोना विषाणूच्या अज्ञात प्रकाराने पसरवलेल्या विषाणू मुळे होत असल्याचं स्पष्ट केलं आहे. यामध्ये सामान्य सर्दी-पडसं ते सार्स सारख्या गंभीर आजाराची लक्षणं दिसून येत आहेत.