Bubonic Plague आजाराची लक्षणं काय? जीवाला धोका किती? जाणून घ्या का म्हणतात याला 'Black Death'!

ब्यूबोनिक प्लेगने यापूर्वी देखील दहशत पसरवली आहे. पहिल्यांदा या आजाराच्या विळख्यात सुमारे 5 कोटी लोकं, दुसर्‍यांदा युरोपची एक तृतीयांश लोकसंख्या तर तिसर्‍यांदा 80 हजार लोकांचा जीव गेला होता. आता पुन्हा चीनमध्ये हा आजार उद्भवला आहे. त्याला ब्लॅक डेथ म्हणून देखील संबोधलं जाते.

आरोग्य टीम लेटेस्टली|
Bubonic Plague आजाराची लक्षणं काय? जीवाला धोका किती? जाणून घ्या का म्हणतात याला 'Black Death'!
Marmots (Photo Credits: Pixabay) Representational Image

अवघं जग कोरोना व्हायरस संकटाशी सामना करत असताना आता चीनमधून अजून एका गंभीर आणि जीवघेण्या आजाराचा धोका समोर आला आहे. ब्यूबोनिक प्लेग (Bubonic Plague) असं आजाराचं नाव असून Marmot (खारीच्या जातीचा एक लहान प्राणी) या आजाराचा उगम झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान उत्तर चीन मध्ये काही भागात Bubonic Plague चे संशयित रूग्ण आढळून आल्याने आता या आजाराबद्दल स्थानिक आरोग्य यंत्रणांनी अलर्ट जारी केला आहे. दरम्यान वेस्टर्न मंगोलिया भागामध्ये सध्या 2 रूग्णांवर ब्यूबानिक प्लेगचे उपचार सुरू आहेत. यामध्ये एक 27 वर्षीय तरूण आणि त्याचा 17 वर्षीय भाऊ आहे. Khovd province मध्ये त्यांचे लॅब टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून दोन वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ब्यूबोनिक प्लेगने यापूर्वी देखील दहशत पसरवली आहे. पहिल्यांदा या आजाराच्या विळख्यात सुमारे 5 कोटी लोकं, दुसर्‍यांदा युरोपची एक तृतीयांश लोकसंख्या तर तिसर्‍यांदा 80 हजार लोकांचा जीव गेला होता. आता पुन्हा चीनमध्ये हा आजार उद्भवला आहे. त्याला ब्लॅक डेथ म्हणून देखील संबोधलं जाते.

Bubonic Plague लक्षणं

Centers for Disease Control and Prevention च्या माहितीनुसार, ब्यूबोनिक प्लेगची लक्षणं ही रूग्णाला बॅक्टेरियाचा किती संसर्ग झाला आहे यावर अवलंबून असतात. ब्यूबोनिक प्लेग मध्ये अचानक ताप येणं, थंडी वाजणं, अशक्तपणा, लिम्फ नोड्समध्ये सूज, वेदना जाणवणं अशी लक्षणं दिसतात. शरीरात बॅक्टेरियाचा प्रवेश झाल्यानंतर त्यांचे लिम्फ नोड्समध्ये वाढणे सुरू होते. जर योग्य वेळी अ‍ॅन्टिबायोटिक्सद्वारा उपचार न झाल्यास शरीराच्या इतर भागात ते पसरू शकतात.

Marmot हा खारी सारखा लहानसा प्राणी बॅक्टेरियाचा प्रवाहक ठरू शकतो असं समोर आलं आहे. दरम्यान त्याच्यामधून लहान fleas (पिस) यांचा दंश झाल्यानेही Yersinia pestis बॅक्टेरिया पसण्याचा धोका आहे. WHO च्या माहितीनुसार, जर 24 तासांत रूग्णावर उपचार झाले नाहीत तर हा आजार जीवघेणा ठरू शकतो.

उत्तर चीन मध्ये जारी करण्यात आलेल्या अलर्टनुसार, आता आजारी किंवा मृत marmot दिसल्यास त्याची माहिती देणं गरजेचे आहे. या प्राण्याची शिकार किंवा मांस खाणं धोक्याचं आहे. त्यामधून बॅक्टेरियाचा प्रसार होऊ शकतो.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
Close
Latestly whatsapp channel