Gallup Global Workplace report 2024: सध्या स्पर्धात्मक जगभरात सगळेच धावपळीचे जीवन जगत आहेत. कामाच्या ठिकाणी डेडलाईन्स, टार्गेट अशा गोष्टी असल्याने काम करणे आव्हानात्मक बनले आहे. घड्याळ्याच्या काट्यावर जग धावत आहे. त्यात कर्मचारी वर्गाची चांगलीच दमछाक होते. ही परिस्थीती केवळ भारतातच नाही तर जगभरात पहायला मिळत आहे. त्याच संबंधी एक माहिती पुढे आली आहे. ज्यात 86% भारतीय कर्मचारी हे नाखूश असून 'संघर्षात्मक' किंवा 'दुःखी' जीवन जगत असल्याचा आकडा समोर आला आहे.तर केवळ 14% कर्मचारी वर्ग त्यांच्या जीवनात समृद्ध, आनंदी, यशस्वी असल्याच समजत आहे. अमेरिकन ओपिनियन पोल एजन्सी गॅलपने त्याबाबतचे निरीक्षण नोंदवले आहे. (हेही वाचा:Cigarette Smoking: आठवड्याला 400 सिगारेट ओढणे ब्रिटनमध्ये किशोरवयीन मुलीच्या जीवावर बेतले; फुफ्फुस बंद पडले, साडेपाच तासांची शस्त्रक्रिया करावी लागली )
2024 गॅलप स्टेट ऑफ द ग्लोबल वर्कप्लेस अहवालातून ही बाब उघडकीस आली. जागतिक स्तरावर कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची आणि कर्मचाऱ्याची सद्यस्थिती तपासणारे एक सर्वेक्षण करण्यात आले. ज्यात जीवन मूल्यमापन निर्देशांकासाठी, गॅलपने कर्मचाऱ्यांना यशस्वी आणि संघर्षात्मक, दुःखी अशा दोन श्रेणींमध्ये वर्गीकृत केले होते. (हेही वाचा: UNICEF Report: जगभरात 40 कोटी मुलांना शिस्तीचे धडे घेताना घरात हिंसेचा सामना करावा लागतो; युनिसेफच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर)
सर्वेक्षणात ज्या कर्मचाऱ्यांचा त्यांच्या सध्याच्या जीवन परिस्थितीबद्दल सकारात्मक दृष्टिकोन होता, त्यांना 7 किंवा त्याहून अधिक रेटिंग देत त्यांना 'संपन्न' श्रेणींमध्ये वर्गीकृत करण्यात आले. तर ताणतणाव आणि आर्थिक चिंतेत जीवन जगत असलेल्या कर्मचाऱ्यांना नकारात्मक दृष्टिकोनामुळे 'संघर्षात्मक' श्रेणींमध्ये वर्गीकृत करण्यात आले. त्यांना 4 किंवा त्याहून कमी रेटींग देण्यात आले. सर्वेक्षणात असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी तशी कबूला दिली आहे. संघर्षात्म जीवन जगत असलेल्यांनी 'त्यांच्याकडे अन्न आणि निवारा या मूलभूत गोष्टींचा अभाव असल्याची तक्रार केली. त्याशिवाय, शारीरिक वेदना आणि खूप तणाव, चिंता, दुःख आणि चिडचिड होत असल्याचे सांगितले.
खरं तर, केवळ भारतच नाही तर संपूर्ण दक्षिण आशियामध्ये यशस्वी आणि आनंदी कर्मचाऱ्यांची टक्केवारी सर्वात कमी आहे. दक्षिण आशियात हा टक्का केवळ 15% आहे. जागतिक सरासरीपेक्षा तो 19 टक्के कमी आहे.
"हा ट्रेंड सर्वेक्षण केलेल्या सर्व देशांमध्ये खरा आहे, भारताने केवळ 14% वाढीचा दुसऱ्या क्रमांकाचा उच्च दर नोंदवला आहे. नेपाळ पहिल्या क्रमांकावर असून तिथे 22% आहे," असे गॅलपने अहवालात म्हटले आहे. भारतातील 35% कर्मचाऱ्यांनी कबूल केले की तो दररोज चिडचिड, संतापाच्या परिस्थीतीतून जातात. ही संख्या दक्षिण आशियातील इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे. श्रीलंकेतील 62% आणि अफगाणिस्तानमध्ये 58% कर्मचारी अशाच पर्स्थीतीतचा सामना करतात.