West Nile Virus in Kerala: केरळमध्ये वेस्ट नाईल तापाच्या 10 प्रकरणांची नोंद; आजाराची लक्षणे आणि उपाय काय आहेत? वाचा सविस्तर
Mosquito | Representational image (Photo Credits: pxhere)

West Nile Virus in Kerala: केरळ (Kerala) मधील कोझिकोड आणि मलप्पुरम जिल्ह्यांमध्ये वेस्ट नाईल व्हायरस (West Nile Virus- WNV) संसर्गाची 10 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यासंदर्भात राज्य आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. उत्तर केरळमधील दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी पाच रुग्ण आढळले आहेत. 10 संसर्गांपैकी नऊ बरे झाले आहेत तर एक कोझिकोड येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. दोन व्यक्तींचा मृत्यू WNV विषाणूमुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, याबात अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. वेस्ट नाईल व्हायरस म्हणजे काय आणि तो कसा पसरतो? हे खालील मुद्द्यांच्या आधारे जाणून घेऊयात.

व्हायरस म्हणजे काय ?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, WNV संक्रमित डासांच्या चाव्याव्दारे मानवांमध्ये पसरतो. जेव्हा डास संक्रमित पक्ष्यांना खातात तेव्हा त्यांना संसर्ग होतो आणि हा विषाणू मानव आणि इतर प्राण्यांमध्ये पसरतो. डब्ल्यूएनव्ही हा फ्लॅविव्हायरस वंशाचा सदस्य आहे आणि जपानी एन्सेफलायटीस अँटीजेनिक सेरोकॉम्प्लेक्सशी संबंधित आहे. (हेही वाचा -Bird Flu Outbreak: 'कच्चे दूध पिऊ नका, पुरेशा तापमानात मांसाहार शिजवा', बर्ड फ्लूबाबत केंद्राचा सल्ला)

WNV ची लक्षणे काय आहेत?

यूएस-आधारित सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, WNV ची लागण झालेल्या 10 पैकी आठ लोकांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत आणि ते स्वतःच बरे होऊ शकतात. तथापि, इतरांना ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, उलट्या आणि अतिसाराचा त्रास होतो. काही प्रकरणांमध्ये, एन्सेफलायटीस किंवा मेंदुज्वर यासारखे गंभीर आजार असू शकतात. ज्याचे घातक न्यूरोलॉजिकल परिणाम होऊ शकतात. तसेच मृत्यू देखील होऊ शकतो. (हेही वाचा -Cardiovascular Disease in Women: 44% स्थूल महिलांमध्ये हृद्यरोगाशी निगडीत आजार - PGIMER study)

निदान आणि उपचार पद्धती -

संसर्गाचे निदान करण्यासाठी IgG अँटीबॉडी सेरो-कन्व्हर्जन, IgM अँटीबॉडी कॅप्चर एन्झाइम-लिंक्ड इम्युनोसॉर्बेंट ऍसे (ELISA), न्यूट्रलायझेशन ऍसे आणि सेल कल्चरद्वारे चाचण्या केल्या जाऊ शकतात. या आजारावर मानवांसाठी अद्याप कोणतीही लस ज्ञात नाही. गंभीर प्रकरणांमध्ये, रूग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते. (हेही वाचा: Uttarakhand: डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या धोक्याबाबत आरोग्य विभाग सतर्क, आरोग्य सचिवांनी ॲडव्हायझरी केली जारी)

दरम्यान, WNV तापाचे पहिले प्रकरण 2011 मध्ये केरळमध्ये नोंदवले गेले. तेव्हापासून अनेक जिल्ह्यांमध्ये या विषाणूचा नियमित प्रादुर्भाव होत आहे. दोन मृत्यू - 2019 मध्ये एक सहा वर्षांचा मुलगा आणि 2022 मध्ये एका 47 वर्षांच्या पुरुषाचा समावेश आहे. केरळमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे निपाह, झिका, चिकनगुनिया, डेंग्यू, WNV, कायसनूर फॉरेस्ट डिसीज (KfD) सारख्या विषाणूजन्य आणि नॉन-व्हायरल दोन्ही रोगजनकांच्या प्रादुर्भावाची नोंद झाली आहे.