Omar Khayyam Birth Anniversary Google Doodle: ओमर खय्याम यांच्या 971 व्या जन्मदिवशी गुगलने साकारले अनोखे डुडल (Watch Video)
Omar Khayyam Birth Anniversary Google Doodle (Photo Credits: Google Doodle)

Google Doodle Celebrates Omar Khayyam Birth Anniversary: प्रख्यात पर्शिअन गणितज्ञ (Persian Mathmetician) व खगोलशास्त्रज्ञ (Astronomer) ओमर खय्याम (Omar Khayyam) यांच्या 971व्या जन्मदिवशी गूगल ने एक डुडल (Google Doodle) साकारत मानवंदना दिली आहे. तंबू बांधणीचे काम करणाऱ्या पर्शियातील एका कुटुंबात 8 मे 1048 साली ओमर यांचा जन्म  झाला होता. आपल्या कारकिर्दीत प्रसिद्ध सौरवर्षाचे कॅलेंडर आणि जलाली कॅलेंडरचा शोध लावला, तब्बल 33 इंटरकेलेशन सायकल चे विश्लेषण असणाऱ्या या कॅलेंडरचा नंतर आलेल्या सर्व कॅलेंडरच्या निर्मितीसाठी वापर केला गेला . आज ओमर यांच्या जन्मदिवशी त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या योगदानाविषयी थोडक्यात जाणून घेऊयात..

ओमर यांनी आपल्या जीवनातील सर्वाधिक काळ हा गणिती शोधांसाठी समर्पित केलं होतं. गणिततज्ञ म्हणून काम करत असताना,क्युबिक समीकरणांचे वर्गीकरण आणि उत्तरे शोधण्यासाठी तयार केलेल्या पद्धतीने त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली होती. भौमितिक पद्धतीने कोनिक्सचा व छेदबिंदूंचा अभ्यास करून तयार केलेली ही सोप्पी पद्धत आकलनात येऊ शकेल असा पहिला शोध मानला जातो. यासोबतच समांतर विश्वाच्या अस्तित्वाबद्दलचे त्यांचे सिद्धांत देखील वैज्ञानिकांकडून अभ्यासले जातात.

एकीकडे गणितासारखा विषय हाताळणारे ओमर हे कवी म्हणून देखील परिचित होते. आपल्या जीवन काळात त्यांनी जवळपास हजारहून देखील जास्त रुबायत व श्लोक तयार केले आहेत. यापैकी 'रुबायत ऑफ ओमर खय्याम' हा एडवर्ड फित्झगेराल्ड याने अनुवाद केलेला कवितांचा संग्रह पश्चिमेकडील देशांमध्ये यांच्या मृत्यूनंतर बरा[Poll ID="null" title="undefined"]च प्रसिद्ध झाला.अरबेक सूत्रांनुसार ओमर यांचे पूर्ण नवं हे अबुल फाथ ओमर इब्न इब्राहिम अल खय्याम असे  असले तरी आपल्या गणित खगोलशास्त्र व कविता या तिन्ही क्षेत्रांमध्ये ते ओमर खय्याम म्हणूनच ओळखले जातात.

तल्लख बुद्धीचे ओमर हे तद्कालीन खोरोसन प्रांतातील मलिक शाह पहिल्या याच्या साम्राज्यात सल्लागार व ज्योतिषी म्हणून काम करत होते. याशिवाय ओमर खय्यम यांनी बीजगणितात देखील मोलाची कामगिरी केल्याचे दिसून येते. आपल्या सांगीतिक व गणित विषयातील शोधांवर आधारित प्रॉब्लेम्स ऑफ अरीथमेटिक हे पुस्तक ओमर यांनी लिहिले आहे.

4 डिसेंबर 1131 मध्ये ओमर यांचा मृत्यू झाला आणि त्यांना खोरासान येथील खय्याम गार्डन मध्ये पर्शियन विधींप्रमाणे पुरण्यात आले.