Makar Sankranti 2020: तिळगूळ, तीळ वडी ते रेवड्या यंदा मकर संक्रांती दिवशी पहा कसे बनवाल हे गोडाचे पदार्थ (Watch Video)
Makar Sankrant Special Tilgul Recipes (Photo Credits: Youtube)

Makar Sankranti Special Recipes:  भारतीय संस्कृतीमध्ये सण साजरा करण्यामागे काही खास कारणं असतात. केवळ सेलिब्रेशन हा उद्देश नसून आपलं आरोग्य जपणं, बदलत्या ऋतूमानानुसार आपल्या आहारात बदल करणंदेखील आणि त्यानुसार वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेणं हा हेतू असतो. मकर संक्रांत हिवाळ्यात येत असल्याने या दिवसांत स्निग्ध पदार्थांची शरीराला गरज असते. मग अशावेळी तेलपोली, तीळगुळ, रेवड्या बनवल्या जातात.  आता सुद्धा जानेवारीचा महिना उजाडला की, मकरसंक्रांतीचे (Makar Sankranti 2020) वेध लागायला सुरुवात होते, या सणाची ओळख म्हणजे तिळगुळाचे लाडू (Tilgul). थंडीचा जोर वाढू लागताच शरीरासाठी लाभदायक असे तीळ पोटात जावेत म्ह्णून पूर्वीच्या महिलांनी शोधलेला हा पदार्थ अगदी आजही हिट आहे, इतकंच काय तर तिळाच्या लाडू शिवाय संक्रांत साजरी होतच नाही असे म्हंटले तरी चालेल. काही ठिकाणी तिळाच्या लाडू सोबतच तिळाची चिक्की , रेवड्या, तीळ पोळी असे पदार्थही आवर्जून बनवले जातात. यंदाची मकरसंक्रांत अगदी तोंडावर आली असताना अजूनही तुमचे हे पदार्थ बनवायचे शिल्लक असतील तर चिंता करू नका, आज या संक्रांत स्पेशल पदार्थांच्या झटपट रेसिपीज (Tilgul Recipes) आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

Makar Sankranti 2020: भोगी, मकर संक्रांती, किंक्रांत चे महत्व, पूजा विधी आणि नियम इथे घ्या जाणून!

हिवाळ्यात शरीराला उष्णतेची आवश्यकता असते तेव्हा तीळ आणि गुळातील प्रथिने यात मदत करतात. तीळगूळ हा शरीरात आजारांना प्रवेश करण्यापासून रोखतो, तीळगूळातील मॅग्नेशियम डायबीटीज, उच्च रक्तदाब दूर करण्यासाठी मदत करतो. तसेच रक्तप्रवाह सुरळीत करून केस आणि त्वचेला वेगळी चमक देण्यातही तीळगूळ फायद्याचा ठरतो. अशा या बहुगुणी तीळगूळाचे हटके पदार्थ यंदा नक्की ट्राय करून पहा..

तिळाचे लाडू

तिळाच्या रेवड्या

तिळाची चिक्की

तीळ पोळी

तिळाची वडी

साहजिकच यासाठी तुम्हाला थोडी सवड असायला हवी पण नेहमीपेक्षा अगदी कमी वेळ लागेल अशा काही रेसिपी आपण पहिल्या आहेत. जिभेचे चोचले आणि शरीर आवश्यक गुणसत्वे देणाऱ्या तिळगुळाचे पदार्थ यंदा या मकरसंक्रांतीला नक्की ट्राय करून पहा आणि हो..हे पदार्थ कसे झाले हे आम्हाला कळवायला विसरु नका.