![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2020/10/dudh-380x214.jpg)
नवरात्रीच्या सणाची काल (२५ ऑक्टोबर) ला दसऱ्याच्या दिवशी सांगता झाली.आता ३० ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद ऋतूतील आश्विन महिन्यातील 'आश्विनी पौर्णिमा'. या दिवशी रात्रीच्या वेळेस चंद्राच्या साक्षीने सुकमेवा वापरून मसाला दूध पिण्याची प्रथा चालत आलेली आहे.हे दूध वेगवेगळ्या आणि आपापल्या पद्धतीने बनवले जाते.आपल्यातील बऱ्याच जणांना खास कोजागिरिच्या दिवशी बनवले जाणारे दूध कसे बनवावे याची माहिती हवी असेल तर आजचा हा लेख खास तुमच्यासाठी आहे.जाणून घेऊयात कोजागिरी स्पेशल दूध बनवण्याची रेसिपी. ( Eid Milad-Un-Nabi 2020 Date: भारतामध्ये यंदा ईद - ए- मिलाद कधी? मुस्लिम बांधवांसाठी या दिवसाचं काय महत्त्व?)
दूधामध्ये नैसर्गिकरित्या थंडावा आणि शरीराला आवश्यक पोषणतत्त्वांचा समावेश असतो. यामुळे दूध हे पूर्ण अन्न समजले जाते. कोजागिरीच्या रात्री चंद्र, चांदण्याची शीतलता शरीराला मिळावी म्हणून त्याच्या छायेखाली बसून दूध आटवून ते पिण्याचा सल्ला दिला जातो.
काही जण साखर, सुकामेवा, जायफळ, वेलची,केशर याचबरोबर खास तयार मिल्क मसाला टाकूनही हे मसाला दूध करतात.तुम्हाला सुद्धा जर मसाला दूध चा मसाला घरी कसा करायचा असेल हे जाणून घ्यायचे असेल तर है व्हिडिओ बघा आणि मिल्क मसाला घरीच तयार करा.
निसर्गाप्रमाणे शरीरातही वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री पूर्ण चंद्र स्थितीमध्ये असताना मोकळ्या जागेत बसावं. थंडगार मसाला दूध पिण्याची प्रथा सुरू झाली आहे.कोजागिरीला प्रत्येक प्रांतात वेगवेगळी नावाने ओळखले जाते. गुजरातमध्ये 'शरद पूर्णिमा', ओडिशामध्ये 'कुमार पौर्णिमा', बंगालमध्ये 'लोख्खी पूजो' असे म्हणतात.उपवास,पूजन व जागरण याचे या व्रतात महत्त्व आहे.त्यामुळे या वर्षी तुम्ही ही कोजागिरी ची संध्याकाळ साजरी करणार असाल तर नक्की या मसाला दूध ची रेसिपी ट्रे करा.