दरवर्षी 10 जानेवारी हा दिवस ‘जागतिक हिंदी दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस हिंदी भाषेचा सन्मान करण्यासाठी आणि तिची महानता जगभर पोहोचवण्यासाठी साजरा केला जातो. याआधी हिंदीचे महत्त्व काही ठिकाणी नाकारले गेले होते, परंतु अलीकडे त्याचे महत्त्व पुन्हा वाढत असल्याचे दिसून येते. हिंदी भाषेबद्दल जागरूकता वाढविणे हा या दिवसाचा उद्देश आहे. या दिवशी जगभरात हिंदी भाषेचा प्रचार केला जातो. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी 10 जानेवारी 2006 रोजी दरवर्षी जागतिक हिंदी दिन साजरा करण्याची घोषणा केली होती.
याआधी जगभरात हिंदीचा विकास आणि प्रचार करण्यासाठी जागतिक हिंदी परिषदेची स्थापना करण्यात आली होती. पहिली जागतिक हिंदी परिषद 10 जानेवारी 1975 रोजी नागपुरात आयोजित करण्यात आली होती. मॉरिशस, त्रिनिदाद आणि टोबॅगो, युनायटेड किंगडम, सुरीनाम, यूएसए आणि दक्षिण आफ्रिका येथे अशाच प्रकारच्या अकरा परिषदा झाल्या. त्यानंतर 10 जानेवारी 2006 रोजी, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने प्रथमच भारताबाहेर जागतिक हिंदी दिवस साजरा केला. तर अशा या खास दिवशी हिंदी Messages, WhatsApp Status, Wishes, Images पाठवून द्या 'जागतिक हिंदी दिना'च्या शुभेच्छा.
जबतक आपके पास राष्ट्रभाषा नहीं,
आपका कोई राष्ट्र भी नहीं!
विश्व हिंदी दिवस की शुभकामनाएं!
राष्ट्रभाषा के बिना राष्ट्र गूंगा है
विश्व हिंदी दिवस की शुभकामनाएं!
हम सबकी यही अभिलाषा,
हिंदी बने राष्ट्रभाषा!
विश्व हिंदी दिवस की शुभकामनाएं!
हिंदी पढ़ें, हिंदी पढ़ाएं,
मातृभाषा की सेवा कर देश को महान बनाएं!
विश्व हिंदी दिवस की शुभकामनाएं!
भारत मां के भाल पर सजी स्वर्णिम बिंदी हूं,
मैं भारत की बेटी आपकी अपनी हिंदी हूं
विश्व हिंदी दिवस की शुभकामनाएं!
(हेही वाचा: यंदाच्या प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’ यावर चित्ररथ; जाणून घ्या काय असेल खास)
दरम्यान, इतर इंडो-आर्यन भाषांप्रमाणे हिंदी ही वैदिक संस्कृतची वंशज आहे. पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, यूएसए, यूके, जर्मनी, न्यूझीलंड, युएई, युगांडा, गयाना, सुरिनाम, त्रिनिदाद, मॉरिशस आणि दक्षिण आफ्रिका यासह अनेक देशांमध्ये हिंदी बोलली जाते. 2019 मध्ये 615 दशलक्ष भाषिकांसह हिंदी ही जगातील तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ठरली आहे.