World Hindi Day 2021: प्रत्येक दिवशी 10 जानेवारीला जागतिक स्तरावर विश्व हिंदी दिवस साजरा केला जातो. या दिवशी जगभरात हिंदी भाषेच्या प्रचारासह ती आंतरराष्ट्रीय भाषेच्या स्तरावर पोहचवणे यामागील उद्देश आहे. याच खास दिवसानिमित्त परराष्ट्र मंत्रालयाकडून विशेष कार्यक्रमाटे आयोजन केले जाते. हिंदीच्या प्रचाराचे काम करतात. खरंतर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी 10 जानेवारीला विश्व हिंदी दिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून प्रत्येक वर्षी 10 जानेवारीला विश्व हिंदी दिवस साजरा केला जातो. तर भारतात 14 सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा करण्यात येतो.
खरंतर 10 जानेवारी 1975 मध्ये नागपूर मध्ये प्रथमच विश्व हिंदी संम्मलेन आयोजित केले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर याचा प्रचार करुन ती भाषा सशक्त केली जाऊ शकते. विश्व हिंदी संम्मेलनात 30 देशांनी भाग घेतला होता. या संम्मेलनाचे उद्दिष्ट हे संयुक्त राष्ट्र संघात हिंदी भाषेला अधिकृत स्थान दिले जावे. ज्यामध्ये 30 देशातील 122 प्रतिनिधी सहभागी झाले होते. यासाठीच या दिवशी विश्व हिंदी दिवस साजरा केला जातो. यामध्ये भारत, युनायटेड किंगडम, मॉरिशस, त्रिनिदाद, टोबॅगो आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेतील विश्व हिंदी दिनानिमित्त कॉन्फरन्सचे आयोजन केले गेले होते.(Hindi Diwas: भारतामध्ये हिंदी दिवस 14 सप्टेंबर दिवशी का साजरा केला जातो? या दिवसाच्या सेलिब्रेशन बाबत '8' इंटरेस्टिंग गोष्टी)
जागतिक आणि राष्ट्रीय हिंदी दिवस यामधील फरक काय?
जागतिक हिंदी आणि विश्व हिंदी दिवस या दोन्ही दिवसांमध्ये फरक आहे. कारण राष्ट्रीय हिंदी दिवस हा प्रथमच 14 सप्टेंबरला पार पडलेल्या हिंदी कॉन्फरन्सनंतर साजरा केला जाऊ लागला आहे. त्यावेळी 1949 मध्ये Constitution Assembly ने हिंदी भाषा ही देशाची अधिकृत देवनागरी भाषा असल्याचे जाहीर केले होते. जागतिक हिंदी दिवसाचा उद्देश असा होता की, हिंदी भाषेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार करणे.