जगातील बर्याच संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या बाबतीत अनेक नियम आहेत. मुस्लीमबहुल राष्ट्रांमध्येतर हे नियम अतिशय कडक मानले जातात. यातील एक नियम म्हणजे हिजाब, नकाब आणि बुरखा. इस्लाममध्ये असे म्हटले आहे की, स्त्रियांनी स्वत: चे वडील आणि पती सोडून इतर सर्व पुरुषांसमोर हिजाब घालणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत महिला स्वत:चे डोके, चेहरा झाकण्यासाठी खास प्रकारच्या कपड्यांचा वापर करतात. 1 फेब्रुवारी रोजी जागतिक हिजाब दिवस साजरा केला जातो. सर्व धर्माच्या आणि पार्श्वभूमीच्या स्त्रियांना हिजाब घालण्यासाठी आणि तो अनुभवण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या दिवसामागील उद्देश आहे.
भारत, पाकिस्तान, इराण, इराक, अमेरिका, इंग्लंडसह जगातील बर्याच मुस्लिम स्त्रिया, आपला चेहरा सोडून डोक्यावरून जे कापड लपेटून घेतात त्याला हिजाब म्हणतात. मात्र जगात असेही काही देश आहे जिथे हिजाब घालण्यावर बंदी आहे. होय, जगातील काही देशांनी सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांनी हिजाब घालण्यावर बंदी घातली आहे. चला पाहूया कोणते आहे हे देश
तुर्की - हा एकमेव मुस्लिम बहुल देश आहे, जिथे सार्वजनिक शाळा, विद्यापीठे किंवा सरकारी इमारतींमध्ये हिजाबवर बंदी घातली आहे,
ऑस्ट्रिया - 2017 मध्ये, ऑस्ट्रियाच्या संसदेने चेहरा झाकणाऱ्या कपड्यांवर कायदेशीर बंदी आणली होती. 2019 मध्ये, ऑस्ट्रियाने दहा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी शाळांमधील हिजाबवर बंदी घातली आहे.
फ्रांस - 2004 मध्ये फ्रान्समधील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये हिजाब घालण्यास बंदी घातली गेली.
कोसोवो – कोसोवा येथे 2009 पासून सार्वजनिक शाळा, विद्यापीठे किंवा सरकारी इमारतींमध्ये हिजाबला बंदी आहे. मात्र 2014 मध्ये, हिजाब असलेली पहिली महिला खासदार कोसोवो संसदेत निवडली गेली.
अफगाणिस्तान - अफगाणिस्तानमध्ये कोणतीही कायदेशीर प्रकारे हिजाबची अंमलबजावणी होत नाही. परंतु मुख्यत्वे सांस्कृतिक दबावामुळे स्त्रिया हिजाब घालतात. 20 व्या शतकात शहरी भागांत स्त्रिया हिजाब घालण्याचे प्रमाण बरेच कमी होते. मात्र 1990 च्या दशकात सिव्हील वॉर सुरू झाल्यावर ही गोष्ट संपुष्टात आली. (हेही वाचा: दहशतवाद्यांना ठेंगा! हिजाब घालून काश्मिरी मुलींनी चौकार-षटकारांची आतषबाजी, पहा हे हटके Photo)
तर, मोरोक्कोसारख्या अन्य मुस्लिम भागात हिजाब घालणार्या स्त्रियांवर निर्बंध किंवा भेदभाव केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या प्रकरणांमध्ये हिजाबकडे राजकीय इस्लाम किंवा धर्मनिरपेक्ष सरकारविरूद्ध कट्टरतावादाचे लक्षण म्हणून पाहिले जाते. दरम्यान, जागतिक हिजाब दिन हा 1 फेब्रुवारी 2013 मध्ये नाजमा खानने सुरु केलेला केलेला वार्षिक कार्यक्रम आहे. हा दिन दरवर्षी जगातील 140 देशांमध्ये साजरा केला जातो