दहशतवाद्यांना ठेंगा! हिजाब घालून काश्मिरी मुलींनी चौकार-षटकारांची आतषबाजी, पहा हे हटके Photo
काश्मिरी मुलगी (Photo Credit: ANI/Twitter)

भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan), या दोन देशात काश्मीर (Kashmir) बाबतचा प्रश्न अजून कायम आहे. अनेक वर्ष उलटूनदेखील याबाबत काही तोडगा काढण्यात नाही आले. दरम्याम, पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन केले जाते. यामुळे जवानांसहित अनेक निष्पाप लोकांचा जीव जातो. जम्मू आणि काश्मीरमध्ये आपण अनेकदा दहशतवादी आणि भारतीय सैन्य यांच्यात झालेल्या चकमकीची बातमी ऐकली असेल किंवा काश्मीरमधील तरुणांनी सैन्यावर दगडफेक केल्याच्या घटना ही ऐकल्या असतीलच. पण यावाचून देखील एक वेगळं जग बसलेलंय काश्मीर खोऱ्यात.

एकीकडे काश्मीरमध्ये कट्टरवादी भारतीय सैन्यावर दगडफेक करताहेत दुसरीकडे, इथल्या मुली हिजाब घालून खेळाच्या मैदानावर चौकार आणि षटकार लावताना दिसल्या. राज्य युवा सेवा आणि क्रीडा विभाग यांच्या वतीने आयोजित केलेल्या मुलींची क्रिकेट स्पर्धा (टेनिस बॉल) सध्या बडगाममध्ये सुरू आहे. या स्पर्धेत जम्मू-काश्मीरमधील विविध जिल्ह्यातील सात संघ सहभागी झाले आहेत. पहा हे फोटो:

दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलाच्या २८० कंपन्या, म्हणाजे २८००० जावं तैनात करण्यात येणार आहे. श्रीनगरमधील अतिसंवेदनशील भागात तसेच अन्य ठिकाणी या जवांनां तैनात केले जाईल. सूत्रांच्या माहिती नुसार, गुरुवारी रात्री अचानक काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा कडक करण्यात आली आहे. शहरात प्रवेश करण्यापासून ते बाहेर जाण्याच्या सर्व रस्त्यांवर सीआरपीएफचे जवान गस्त घालत आहेत.