Women's Equality Day 2022 Messages: संपूर्ण जगाचा विकास तेव्हाच शक्य आहे, जेव्हा महिलांना समान मानवी हक्क मिळतील. ज्याप्रमाणे कुटुंबाच्या योग्य पद्धतीने संगोपनाचे काम महिला करतात, त्याचप्रमाणे समाज आणि देशाच्या उभारणीसाठी आणि योग्य दिशेने विकासासाठी महिलांनी पुढे येणे अत्यंत आवश्यक आहे. पण आजही असे अनेक देश आहेत जिथे महिलांना समान अधिकार मिळालेले नाहीत. ते त्यांच्या हक्कांसाठी लढत आहेत, म्हणून दरवर्षी 26 ऑगस्ट रोजी जगभरात 'महिला समानता दिन' साजरा केला जातो. दरवर्षी हा दिवस एका खास थीमखाली साजरा केला जातो. यावर्षी 'महिला समानता दिना'ची थीम 'सेलिब्रेटिंग वूमेंस राइट टू वोट' अशी आहे.
आम्ही महिला समानता दिनानिमित्त तुमच्यासाठी काही उत्तमोत्तम मेसेज, कोट्स, शायरी संग्रह घेऊन आलो आहोत, जे तुम्ही फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि मेसेजद्वारे आपल्या मैत्रिणींना पाठवून अभिनंदन करू शकता. (हेही वाचा - Women’s Equality Day 2022: महिला समानता दिनानिमित्त, भारतीय महिलांना मिळालेल्या 'या' विशेष अधिकारांबद्दल जाणून घ्या)
स्त्री असते एक आई,
स्त्री असते एक ताई,
स्त्री असते एक पत्नी,
स्त्री असते एक मैत्रिण,
प्रत्येक भूमिकेतील 'ती'चा करा सन्मान.
महिला समानता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
नारी हीच शक्ती आहे नराची,
नारी हीच शोभा आहे घराची,
तिला द्या आदर, प्रेम, माया,
घरामध्ये आपोआप निर्माण होईल जिव्हाळा.
महिला समानता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्मरण त्यागाचे,
स्मरण शौर्याचे,
स्मरण कर्तृत्त्वाचे,
स्मरण स्त्री पर्वाचे.
महिला समानता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्री म्हणजे वास्तव्य,
स्री म्हणजे मांगल्य,
स्री म्हणजे मातृत्व,
स्री म्हणजे कतृत्व
महिला समानता दिनाच्या सर्व भगिणींना हार्दिक शुभेच्छा!
ती आहे म्हणून हे विश्व आहे.
ती आहे म्हणून घराला घरपण आहे.
ती आहे म्हणून नात्यांत जिवंतपणा आहे.
तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
महिला समानता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
महिलांच्या अधिकारांसाठीचा लढा पहिल्यांदा अमेरिकेत 1853 मध्ये सुरू झाला. ज्यामध्ये महिलांनी लग्नानंतर संपत्तीवर हक्क मागितला. त्यावेळी अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये महिलांना अत्यंत कमी अधिकार दिले जात होते आणि त्यांना पुरुषांच्या गुलामांसारखी वागणूक दिली जात होती. यानंतर 1890 मध्ये अमेरिकेत 'नॅशनल अमेरिकन वुमेन्स सफ्रेज असोसिएशन'ची स्थापना झाली. या संस्थेने महिलांना मतदानाचा अधिकार देण्याबाबत बोलले. यानंतर 1920 साली अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. 1971 मध्ये अमेरिकन संसदेने दरवर्षी 26 ऑगस्ट हा दिवस 'महिला समानता दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. त्यानंतर इतर देशांनीही हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.