
Republic Day 2024 Message In Marathi: 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. परंतु, भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी आत्मसात करण्यात आले. त्यानुसार भारताला लोकशाही, सार्वभौम आणि प्रजासत्ताक देश घोषित करण्यात आले. 26 जानेवारी 1950 रोजी देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 21 तोफांची सलामी देऊन ध्वजारोहण केले आणि भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित केले. ऐतिहासिक क्षणांमध्ये गणला जाण्याचा तो काळ होता. तेव्हापासून, दरवर्षी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
आपल्या राज्यघटनेने देशातील नागरिकांना आपले सरकार लोकशाही पद्धतीने निवडण्याचा अधिकार दिला आहे. राज्यघटनेच्या अंमलबजावणीनंतर डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सध्याच्या संसद भवनातील दरबार हॉलमध्ये राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर पाच मैल लांब परेड सोहळ्यानंतर त्यांनी इर्विन स्टेडियमवर राष्ट्रध्वज फडकावला. प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही सोशल मीडियावर खालील मेसेज शेअर करून मित्र-परिवारास या खास दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.
स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात,
देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया,
चला आपण आपला भारत सुरक्षित,
सुविकसित बनवूया,
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तनी – मनी बहरूदे नवा जोम
होऊ दे पुलकित रोम रोम
घे तिरंगा हाती
नाभी लहरु दे उंच जयघोष ,
मुखी जय भारत – जय हिंद गर्जु दे आसमंत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

स्वर्गाहुनी प्रिय आम्हाला अमुचा सुंदर देश...
आम्ही सारे एक... जरी नाना जाती नाना वेष…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

स्वातंत्र्य आमच्या मनात
ताकत आमच्या शब्दात
शुद्धता आमच्या रक्तात
स्वाभिमान भारतीय असण्याचा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

विविधतेतील एकता या देशाची शान आहे
म्हणूनच माझी भारतभूमी महान आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भारत ही रंगीबेरंगी विविधता आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेला जगातील सर्वात प्राचीन संस्कृती असणारा एक देश आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने बहुआयामी सामाजिक आणि आर्थिक प्रगती केली आहे. भारत कृषी क्षेत्रात स्वावलंबी झाला आहे आणि आता जगातील सर्वात औद्योगिक देशांमध्ये त्याची गणना केली जाते.