World Sleep Day 2021: दरवर्षी मार्च महिन्यातील तिसर्या शुक्रवारी 'वर्ल्ड स्लीप डे' साजरा केला जातो. यावर्षी 19 मार्च म्हणजेचं आज 'वर्ल्ड स्लीप डे' साजरा केला जात आहे. 'वर्ल्ड स्लीप डे' प्रथम 2008 मध्ये साजरा करण्यात आला. तेव्हापासून 'वर्ल्ड स्लीप डे' दरवर्षी मार्च महिन्यात तिसर्या शुक्रवारी साजरा केला जातो. झोप आणि आरोग्य यांच्यातील संबंधांबद्दल लोकांना जागरूक करणे हा त्यामागचा मुख्य हेतू आहे. धावपळीच्या जीवनशैलीमुळे लोकांना आजकाल पुरेशी झोप मिळत नाही. याचा त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो. यासाठी, डॉक्टर दररोज किमान 8 तास झोपण्याची शिफारस करतात. यावर्षी 'वर्ल्ड स्लीप डे' ची थीम 'Regular Sleep, Healthy Future' अशी आहे. या खाल लेखातून 'वर्ल्ड स्लीप डे' चा इतिहास आणि महत्त्व समजून घेऊयात.
'वर्ल्ड स्लीप डे' चा इतिहास -
वर्ल्ड स्लीप सोसायटी (World Sleep Society) वर्ल्ड स्लीप डेच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित करते. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे लोक बर्याच आजारांचे बळी पडतात. हे रोखण्यासाठी वर्ल्ड स्लीप सोसायटीने 'वर्ल्ड स्लीप डे' सुरू केला. आज जगातील 88 हून अधिक देशांमध्ये 'वर्ल्ड स्लीप डे' साजरा केला जातो. प्रथम हा दिवस 2008 मध्ये साजरा करण्यात आला. निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. यासाठी वर्ल्ड स्लीप सोसायटीने वर्ल्ड स्लीप डे साजरा करण्यास सुरुवात केली. जेणेकरुन लोक झोपेत्या बाबतील जागरूक होतील. (वाचा - World Sleep Day: नवजात बालकं, प्रौढ व्यक्ती, वृद्ध लोकं यांना निरोगी आरोग्यसाठी किती तास झोप आवश्यक?)
'वर्ल्ड स्लीप डे' चे महत्त्व -
आधुनिक काळात लोक चुकीचे खाणे, दिनचर्या, तणाव आणि कमी झोपेमुळे विविध प्रकारच्या आजाराने त्रस्त आहेत. कमी झोप आणि तणाव यांचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. वर्ल्ड स्लीप सोसायटीचे हे पाऊल कौतुकास्पद आहे. याद्वारे लोकांना पुरेशा झोपेची महत्त्व पटवून दिलं जातं. तुम्हीही स्वत: ला निरोगी ठेवू इच्छित असल्यास, दररोज 8 तासांची झोप नक्की घ्या. 'लेटेस्ट ली' मराठीकडून तुम्हाला 'वर्ल्ड स्लीप डे' च्या खूप खूप शुभेच्छा.