National Vaccination Day 2021: भारतात 'राष्ट्रीय लसीकरण दिन' का साजरा केला जातो? जाणून घ्या तारीख, महत्त्व आणि इतिहास
National Vaccination Day 2021 (PC - File Image)

National Vaccination Day 2021: देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी भारतात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भारतात लसीकरण मोहिमेचा प्रत्यय पुन्हा एकदा सर्वांना आला आहे. जगभरात कोरोना विषाणूमुळे 26 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यावर्शी राष्ट्रीय लसीकरण दिन भारतात अगदी योग्य वेळी साजरा होणार आहे. सध्या जगातील अनेक देशांसह भारतात कोविड-19 लसीकरण मोहीम सुरू आहे. या निमित्ताने आपण राष्ट्रीय लसीकरण दिनामागील इतिहासा महत्त्व जाणून घेऊयात.

भारतात, दरवर्षी 16 मार्च हा दिवस राष्ट्रीय लसीकरण दिवस दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय लसीकरण दिन प्रथम 16 मार्च 1995 रोजी साजरा करण्यात आला. 1995 मध्ये या दिवशी पोलिओ लसीचा पहिला डोस भारतात देण्यात आला होता. सरकारने भारतातून पोलिओ निर्मूलनाची मोहीम पल्स पोलिओ मोहिमेच्या माध्यमातून सुरू केली होती. (वाचा - Covid-19 Vaccination in India: 1 मार्चपासून सुरु होणाऱ्या कोविड-19 लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन कसे कराल? जाणून घ्या)

या सर्वसमावेशक कार्यक्रमांतर्गत 5 वर्षाखालील सर्व मुलांना पोलिओ लसीचे 2 थेंब देण्यात आले. तेव्हापासून हळू हळू पोलिओचे प्रमाण कमी झाले आणि अखेर आता भारताने पोलिओवर बऱ्यापैकी मात केली आहे. 2014 मध्ये भारत पोलिओमुक्त देश म्हणून घोषित झाला.

गेल्या दोन दशकांमध्ये, धोकादायक आजारांशी लढण्यासाठी लस एक अविभाज्य साधन बनलं आहे. यामुळे, लक्षावधी लोकांना टिटॅनस, पोलिओ आणि टीबी यासारख्या अत्यंत गंभीर आजारापासून वाचविण्यात यश आलं आहे.

राष्ट्रीय लसीकरण दिनाचे महत्त्व -

जगातील सर्व लोकांसाठी लसीचे महत्त्व माहित आहे. विशेषत: कोविड-19 साथीच्या रोगादरम्यान प्रत्येकाला लसचे महत्त्व कळले आहे. प्राणघातक आणि धोकादायक आजार रोखण्यासाठी लस हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. आज, जगभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिमेमुळे गोवर, टिटॅनस यासारख्या अत्यंत संसर्गजन्य आणि धोकादायक आजारांचा नाश झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी लसीकरणाद्वारे 2-3 दशलक्ष लोकांचे जीव वाचतात.