Ganesh Visarjan 2024: गणेश विसर्जनाच्या (Ganesh Visarjan 2024) दिवशी, भक्तगण गणपतीला ढोल-ताशाच्या गजरात निरोप देतात आणि त्याची मूर्ती पवित्र नद्यांमध्ये विसर्जित करतात. या दिवशी बाप्पा आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. पण गणपती विसर्जन (Ganpaati Visarjan 2024) का केले जाते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? दहा दिवसांच्या पूजेनंतर गणपतीची मूर्ती पाण्यात का विसर्जित केली जाते? (Why Ganesh Idol is Immersed in Water) आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.
पौराणिक मान्यतेनुसार श्री वेद व्यासांनी गणेश चतुर्थीपासून सलग दहा दिवस श्री गणेशाला महाभारत कथा सांगितली होती. दहा दिवसांनी जेव्हा वेद व्यासजींनी डोळे उघडले तेव्हा त्यांना समजले की दहा दिवसांच्या मेहनतीनंतर गणेशजींचे तापमान खूप वाढले आहे. अशा स्थितीत वेद व्यासजींनी गणेशजींना ताबडतोब जवळच्या तलावात नेऊन थंड पाण्याने आंघोळ घातली. त्यामुळेच अनंत चतुर्दशीला गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. (हेही वाचा -Anant Chaturdashi Puja 2024: अनंत चतुर्दशीच्या दिवशी 'अशी' करा गणरायाची विधीवत पूजा; साहित्य, पूजाविधी आणि महत्त्व घ्या जाणून)
गणेश चतुर्दशी आणि विसर्जनाचा महिमा -
भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून गणेशोत्सव सुरू होतो. चतुर्दशी तिथीपर्यंत गणेशाची पूजा केली जाते. श्री गणेश मूर्तीची स्थापना चतुर्थी तिथीला केली जाते आणि चतुर्दशी तिथीला बाप्पाचे विसर्जन केले जाते. या नऊ दिवसांना गणेश नवरात्र म्हणतात. असे मानले जाते की मूर्तीचे विसर्जन करून भगवान पुन्हा कैलास पर्वतावर पोहोचतात. या दिवशी अनंत शुभ फळ मिळू शकतात. म्हणून या दिवसाला अनंत चतुर्दशी असेही म्हणतात.