World Radio Day 2024 (PC - File Image)

World Radio Day 2024: ज्याकाळी माध्यमांचा फारसा विकास झाला नव्हत्या, त्यावेळी रेडिओ हे एक उत्तम मनोरंजनाचे साधन होते. आता माध्यम लोकांपर्यंत पोहोचली आहेत. सोशल मीडियामुळे लोक एकमेकांना कनेक्ट झाले असून मनोरंजनाच्या सर्व सोयी मोबाईलवर उपलब्ध आहेत. परंतु, आजही काहींजण रेडिओ ऐकण्याची आवड जपताना दिसतात. खरं तर या सगळ्यावर बोलायचं निमित्त म्हणजे जागतिक रेडिओ दिवस (World Radio Day 2024). दिवस दरवर्षी 13 फेब्रुवारी रोजी जगभरात जागतिक रेडिओ साजरा केला जातो. या दिवशी, दरवर्षी युनेस्को जगभरातील प्रसारक, संस्था आणि समुदायांच्या सहकार्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. संवादाचे माध्यम म्हणून रेडिओच्या भूमिकेवर चर्चा करून लोकांना त्याची जाणीव करून दिली जाते. रेडिओ ही जगभरातील माहितीची देवाणघेवाण करणारी सेवा आहे.

आपत्ती किंवा आणीबाणीच्या काळात रेडिओचे महत्त्व वाढते. अशा परिस्थितीत जगभरातील तरुणांना रेडिओची गरज आणि महत्त्वाची जाणीव करून देणे हा जागतिक रेडिओ दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. तथापी, माहितीचा प्रसार करण्यासाठी रेडिओ हे सर्वात शक्तिशाली आणि स्वस्त माध्यम म्हणून ओळखले जाते. रेडिओ हे शतकानुशतके जुने माध्यम असूनही त्याचा वापर संवादासाठी होत आहे. (वाचा -Maghi Ganesh Jayanti 2024: माघी गणेश जयंतीची तारीख, मुहूर्त, आणि महत्व, जाणून घ्या)

जागतिक रेडिओ दिवस इतिहास -

जागतिक रेडिओ दिन 2011 मध्ये सुरू झाला. 2010 मध्ये, स्पॅनिश रेडिओ अकादमीने प्रथम 13 फेब्रुवारी हा जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. 2011 मध्ये, युनेस्को सदस्य देशांनी हा प्रस्ताव स्वीकारला आणि 13 फेब्रुवारी हा जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. नंतर 2012 मध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनेही ते स्वीकारले. त्यानंतर त्याच वर्षी 13 फेब्रुवारी रोजी युनेस्कोने प्रथमच जागतिक रेडिओ दिवस साजरा केला. (वाचा - Haldi Kunku Last Date: यंदा रथसप्तमी कधी? जाणून घ्या हळदी कुंकूचा कार्यक्रम करण्याची शेवटची तारीख)

दरम्यान, 13 फेब्रुवारीला जागतिक रेडिओ दिवस साजरा करण्यामागे एक खास कारण आहे. संयुक्त राष्ट्र रेडिओ 13 फेब्रुवारी 1946 रोजी सुरू झाली. युनायटेड नेशन्स रेडिओच्या वर्धापनदिनानिमित्त जागतिक रेडिओ दिवस साजरा केला जाऊ लागला.