Tulsi Vivah 2024 Date: तुळशी विवाह (Tulsi Vivah 2024) दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला साजरा केला जातो. हा उत्सव अकराव्या चंद्र दिवसापासून म्हणजेच प्रबोधिनी एकादशीपासून सुरू होतो आणि पौर्णिमेच्या रात्री किंवा कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालतो. या दिवशी भगवान विष्णू आणि माता तुळशीचा विवाह लावला जातो. या दिवसापासून सर्व शुभ कार्ये पुन्हा सुरू होतात. या दिवशी घरोघरी आणि मंदिरात माता तुळशीचा विवाह आयोजित केला जातो.
तुळशी विवाह 2024 शुभ मुहूर्त -
द्वादशी तिथी 12 नोव्हेंबरला दुपारी 4:04 वाजता सुरू होईल, जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 नोव्हेंबरला दुपारी 1:01 वाजता संपेल. उदयतिथीमुळे 13 नोव्हेंबरला तुळशी विवाह साजरा होणार आहे. (हेही वाचा -Chhath Puja 2024 Date: छठ पूजा कधी आहे? तारीख आणि महत्त्व घ्या जाणून)
तुळशी विवाह पूजा विधी -
- भगवान विष्णू आणि तुळशीचा विवाह सामान्य हिंदू रीतिरिवाजानुसार केला जातो. तुळशी विवाहाच्या दिवशी व्रत पाळले जाते जे विवाहसोहळा पूर्ण झाल्यानंतर सोडले जाते. त्यामुळे तुम्ही या दिवशी व्रत पाळू शकता.
- तुळशी विवाहात मंडप फुलांनी किंवा साडीने तयार केला जातो. त्यानंतर तुळशीचे रोप आणि भगवान विष्णूच्या मूर्तीला स्नान घालण्यात येते. त्यानंतर त्यांना फुलांच्या हार घालण्यात येतात.
- तुळशी विवाहादरम्यान तुळशीचा साज-शृंगार केला जातो. तुळशी मातेला दागिने, लाल बिंदी, साडी इत्यादींनी सजवले जाते. त्याचबरोबर भगवान विष्णूचा शाळीग्राम धोतर नेसवले जाते.
- तुळशी विवाहादरम्यान, नवविवाहित जोडप्यावर ज्याप्रमाणे अक्षतांचा वर्षाव केला जातो. त्याचप्रमाणे तांदूळाचा वर्षाव केला जातो आणि मंगलअष्टकांच्या सुरात तुळशी विवाहाची सांगता केली जाते. विवाह संपन्न झाल्यानंतर सर्व भाविकांना प्रसाद किंवा जेवण दिले जाते.
तुळशी विवाहाचे महत्व -
हिंदू धर्मात तुळशी विवाहाला विशेष महत्त्व आहे. याला देवूठाणी एकादशी असेही म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू आपल्या चार महिन्यांच्या योगनिद्रातून जागे होतात. हिंदू धर्मग्रंथानुसार या चार महिन्यांत म्हणजे चार्तुमास कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. सर्व शुभ कार्यांची सुरुवात तुळशी विवाहाने होते. असे मानले जाते की, जो घरी तुळशी विवाह आणि पूजा आयोजित करतो, त्याच्या कुटुंबातील संकटे दूर होतात.