When is Mother's Day 2022 in India? जाणून घ्या तारीख, इतिहास आणि साजरा करण्याची पद्धत

माता डिंकासारख्या असतात. तुम्ही त्यांचे काम प्रयत्न पाहू शकत नसले तरीही ते कुटुंबाला एकत्र ठेवतात. मे महिन्यातील दुसरा रविवार हा मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. यावर्षी, मदर्स डे रविवारी, 8 मे रोजी येणार आहे. सर्व देश एकाच तारखेला मदर्स डे साजरा करत नाही, तरीही, पन्नासपेक्षा अधिक राष्ट्रे आहेत जिथे मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, फिनलंड, इटली, स्वित्झर्लंड, तुर्की, भारत आणि बेल्जियम येथे मे महिन्यात मातृदिन साजरा करतात. युनायटेड किंगडम, आयर्लंड आणि इतर काही देश मदरिंग संडे म्हणून साजरा करतात जो लेंट दरम्यान चौथ्या रविवारी साजरा केला जातो. आईबद्दलच्या भावना भरभरुन बोलल्या जातात ते म्हणजे ज्या दिवशी मातृदिन असतो . जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो . असा हा मातृदिन अर्थातच Mother’s Day साजरा करण्यास नेमकी सुरुवात कशी झाली? जाणून घ्या मदर्स डे चा इतिहास

मातृदिन म्हणजे काय?

जगभरातील सर्व आई साठी हा दिवस असतो. प्रजातीतील प्रत्येकाला सृष्टीत जन्म दिला आहे अशा स्त्रीसाठी मातृदिन असतो. तिच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी, तिचा सन्मान करण्यासाठी, इतरांसाठी सतत कष्ट उपसत असताना प्रत्येक टप्प्यावर जिची भूमिका बदलत जाते अशा प्रत्येक स्त्रिसाठी विशेषत्वाने साजरा केला जाणारा दिवस म्हणजे मातृदिन.

मातृदिनचा इतिहास

मातृत्वदिनाची पहिली सुरुवात झाली ती अमेरिका देशात. या दिवसाची उत्पत्ती ज्युलिया वार्ड हॉवे आणि अॅना जार्विस या दोन महान महिलांना दिली जाते, ज्यांनी मातृदिनाची कल्पना प्रस्थापित केली असे मानले जाते. अमेरिकन अॅक्टिविस्ट अॅना जार्विस ही आपल्या आईवर प्रचंड प्रेम करत होती. ती अविवाहीत होती. तसेच, तिने एखादे अपत्यही दत्तक म्हणून घेतले नव्हते. ती सदैव आपल्या आईसोबतच राहात असे. जिवलग आईचा मृत्यू झाल्यावर अॅना जार्विस हिने आईच्या स्मृतिप्रित्यार्थ मदर्स डे (Mother’s Day) साजरा करण्यास सुरुवात केली. 1914 मध्ये युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित केला.

मदर्स डे ची तारीख कधीच ठरलेली नसते का ?

जगभरात साजरे केले जाणारे विविध दिवस हे विशिष्ठ तारखेला असतात. पण, मदर्स डेची तारीख निश्चित नाही. असे की, हा दिवस साजरा करण्यासाठी कोणतीच तारीख कधीही ठरलेली नसते. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी 9 मे 1914 रोजी एक कायदा संमत केला. या कायद्यात लिहिले होते की, प्रत्येक वर्षाच्या दुसऱ्या रविवारी Mother’s Day साजरा करण्यात यावा. अमेरिकेत हा कायदा पास झाला त्यानंतर भारत आणि इतर देशांमध्येही हा दिवस साजरा केला जाऊ लागला. आणि तो सुद्धा प्रत्येक वर्षीच्या मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी. यंदा Mother’s Day 12 मे रोजी आहे.

मदर्स डे साजरा करण्याची पद्धती

मदर्स डे साजरा करण्याच्या पद्धती व्यक्ती, संस्था आणि समाजपरत्वे विभिन्न आढळतात. काही संस्था या दिवसानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करतात. ज्यात चर्चा, परिसंवाद, आरोग्य शिबिरं आदिंचा समावेश असतो. तर, काही लोक आर्थिक रुपात, किंवा वस्तू रुपात आईला भेट देतात. काही लोक आपले प्रेम व्यक्त करतात. प्रेम व्यक्त करण्याची भावना ही सर्वांची विभिन्न असते.